CET : एमपीएससी पूर्व अन् बी. एड्. सीईटी एकाच दिवशी? विद्यार्थ्यांनो, काळजी नको, सरकारनं घेतला निर्णय; वाचा सविस्तर

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीची पूर्व परीक्षा आणि त्याचबरोबर बी. एड्. सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट या एकाच दिवशी ठेवण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता.

CET : एमपीएससी पूर्व अन् बी. एड्. सीईटी एकाच दिवशी? विद्यार्थ्यांनो, काळजी नको, सरकारनं घेतला निर्णय; वाचा सविस्तर
विधान परिषदेत माहिती देताना चंद्रकांत पाटीलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 3:24 PM

मुंबई : एमपीएससी पूर्व (MPSC) परीक्षा आणि बी. एड्. अभ्यासक्रमाची सीईटी एकाच दिवशी होत आहेत. 21 तारखेला दोन्ही परीक्षांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. परीक्षांच्या तारखा बदलाव्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. एकाच दिवशी परीक्षा आल्यामुळे परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आली होती. यासंबंधी विद्यार्थ्यांनी राज्य सीईटी सेलच्या (State CET Cell) सचिवांना पत्र लिहिले होते. आता यासंबंधी सरकारने पर्याय दोन्ही परीक्षा देणाऱ्यांना तारखेबाबत पर्याय देण्यात येणार असल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांना देता येणार आहेत.

विद्यार्थी होते संभ्रमात

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीची पूर्व परीक्षा आणि त्याचबरोबर बी. एड्. सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट या एकाच दिवशी ठेवण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता. या दोन्ही परीक्षा एकाच तारखेला आल्याने विद्यार्थ्यांची चलबिचल वाढली होती. दोन्ही परीक्षा देणारे विद्यार्थी चिंतेत होते. एका परीक्षेला मुकावे लागणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. सरकारने आता यावर तोडगा काढला आहे.

हे सुद्धा वाचा

‘सीईटी सेलशी संपर्क साधावा’

दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तारखांबाबत पर्याय देणार असल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. परीक्षार्थींनी त्वरीत सीईटी सेलशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. रविवार, सोमवार आणि मंगळवार अशा तीन दिवस परीक्षा असल्याने संबंधित विद्यार्थ्यांनी संवाद साधल्यास त्यांना सोमवार आणि मंगळवार अशा दोन दिवसांत त्यांना संधी दिली जाईल, असा निर्णय झाल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकवेळा अशा समस्यांना सामोरे जावे लागले. राज्य सरकारच्या वतीने विविध सीईटी परीक्षा घेतल्या जातात. मात्र त्यांच्या तारखा कधी कधी एकाच दिवशी येतात. अशावेळी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेण्याची मागणी होत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.