MSRTC Employees Strike : तोडगा निघाला, एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 6500 रुपयांची वाढ, संप मागे

एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडे सहा हजारांची वाढ केली आहे. 

MSRTC Employees Strike : तोडगा निघाला, एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 6500 रुपयांची वाढ, संप मागे
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 9:30 PM

एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडे सहा हजारांची वाढ केली आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचं शिष्टमंडळ उपस्थित होतं. तसेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते, एसटी कष्टकरी जनसंघच्या जयश्री पाटील या देखील बैठकीला उपस्थित होत्या. मुख्यमंत्री एसटी कर्मचाऱ्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होणार का? याकडे राज्याचं लक्ष होतं. अखेर एकनाथ शिंदे यांना याबाबत मोठं यश आलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी 5000 रुपयांची वेतनात वाढ करण्याची मागणी केली होती. पण सरकारने तब्बल 6500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मी मनापासून आभार मानतो. आमची मागणी होती की, राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांच्या वेतननुसार महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना वेतम मिळावं. किमान त्यांच्या लेव्हलला घेऊन जायला पाहिजे. सरकाने त्यासाठी जी समिती नेमली होती त्या समितीने साडेपाच हजारांची मागणी सरसकट करावी, अशी सूचना केली होती. आमची मागणी पाच हजार रुपये वेतन वाढवण्याची मागणी केली होती. सरकारने आमची मागणी मान्य केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2021 मध्ये अडीच हजार, चार हजार आणि पाच हजार अशी सरसकट वाढ केली होती. त्या कर्मचाऱ्यांना सरसकट साडेसहा हजार रुपयांची वेतनात वाढ केली आहे”, अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली.

नेमकी पगारवाढ कशी झाली?

“ज्यांना 5 हजार रुपयांची वाढ 2021 झाली होती, त्यांच्या पगारात आता दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. तसेच 2021 ला ज्यांना चार हजार रुपयांची वाढ दिली होती त्यांच्या पगारात अडीच हजारांची वाढ झाली. ज्यांना अडीच हजारांची वाढ दिली होती त्यांच्या पगारात 4 हजार रुपयांची भरघोस वाढ सरकारने केली आहे. मी या निमित्त राज्य सरकारचा महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो”, अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली. तसेच पडळकर यांनी सर्व एसटी कर्मचाऱ्यांना उद्या सकाळी सात वाजेपासून कामावर जाण्याचं आवाहन केलं.

सरकार ‘त्या’ कर्मचाऱ्यांवरील केस मागे घेणार

कामगार नेते किरण पावसकर यांनीदेखील या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानावे लागतील. गोपीचंद पडळकर यांनी संपाबाबत आधीच कल्पना दिली आहे. ज्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही गेलो होतो. एसटी कर्मचाऱ्यांना सडळ हस्ते मदत मिळाली आहे. जे कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून घरी बसले आहेत, छोट्या केसेस आहेत, शंभर रुपयांची किंवा पन्नास रुपयांची केस असेल, दहा, वीस रुपयांच्यी केस असेल, त्या सर्व कर्मचाऱ्यांची कारवाई संपवून त्यांना कामावर घ्या, अशा पद्धतीचा आदेश या बैठकीत देण्यात आलेला आहे. 2020 पासून 2024 पर्यंतची थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. महाराष्ट्रात ही पहिली वेळ आहे की, सर्व २३ संघटनांचे कर्मचारी होते ते सर्व आनंदी झाले आहेत. मी पुन्हा एकदा सरकारचा आभारी आहोत”, अशी प्रतिक्रिया किरण पावसकर यांनी दिली.

“यात सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, 250 डेपो आहेत, काही डेपो रिपेअर करायचे आहेत, कर्मचाऱ्यांचे रेस्ट रुम आहेत, ते सर्व रेस्ट रुम रिपेअर केले जातील, असं सरकाने सांगितलं आहे”, अशी माहिती पावसकर यांनी दिली.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता मिळावा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच घरभाडं भत्ता मिळावा. एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट 5 हजार रुपयांची वेतनवाढ मिळावी, अशा आंदोलकांच्या प्रमुख मागण्या होत्या.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.