राज ठाकरेंनी अंबानींच्या ज्या सुरक्षा व्यवस्थेवर सवाल केला ती नेमकी कशी आहे? वाचा सविस्तर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर सवाल केला आहे. (Mukesh Ambani has India’s highest security rating)

राज ठाकरेंनी अंबानींच्या ज्या सुरक्षा व्यवस्थेवर सवाल केला ती नेमकी कशी आहे? वाचा सविस्तर
Mukesh Ambani
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 1:21 PM

मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर सवाल केला आहे. त्यामुळे अंबानी यांची सुरक्षा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अंबानी यांची सुरक्षा नेमकी आहे कशी? याचा घेतलेला हा आढावा. (Mukesh Ambani has India’s highest security rating)

राज नेमकं काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी अंबांनी यांच्या सुरक्षेबाबत भाष्य करत काही सवालही केले आहेत. इस्रायलच्या सुरक्षेत असलेल्या अंबांनीच्या आसपास कुणीही फिरकू शकत नाही. मग तिथे वाझेंनी स्फोटके कशी ठेवली? कुणाच्या सांगण्यावरून ठेवली असा सवाल राज यांनी केला आहे.

झेड प्लस सुरक्षा असलेले एकमेव उद्योगपती

मुकेश अंबानी देशातले एकमेव असे उद्योगपती आहेत ज्यांना Z plus Security मिळते. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसंच काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांसारख्या नेत्यांना जी Z plus Security आहे, ती सुरक्षा मुकेश अंबानी यांना आहे. तसंच मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना Y कॅटेगरीची सुरक्षा मिळते.

NSG आणि SPG कमांडोसोबत 55 सुरक्षारक्षक

अंबानी जेव्हा घरातून बाहेर पडतात. तेव्हा दोन डझन सुरक्षा गार्ड त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. अंबानी यांना Z plus Security असल्याने त्यांच्या सुरक्षेला 55 सुरक्षारक्षक असतात. या सुरक्षा रक्षकांमध्ये NSG आणि SPG कमांडो असतात. या दोन्ही ग्रुपचे कमांडो विशेष प्रशिक्षित असतात. संबंधित व्यक्तीभोवती पहिलं कडं करण्याची जबाबदारी NSG कमांडोवर असते. तर दुसऱ्या लेअरमध्ये SPG कमांडो असतात. याशिवाय ITBP और CRPF जवान देखील सुरक्षेसाठी तैनात असतात. ज्यांना झेड वर्गाची सुरक्षा मिळते त्यांच्या पुढे एस्कॉर्ट कार चालते. नागरी भागात येताच त्यांना सुरक्षा रक्षकांकडून घेराव घातला जातो.

बुलेटप्रूफ कार, गाडीच्या ताफ्याच्या पुढे रॉयल एनफील्ड बाईक्स

मुकेश अंबानी यांच्या ताफ्यात व्हाइट मर्सिडीज AMG G63 या मॉडलची कार सामिल असते. याचसोबत ताफ्याच्या सगळ्यात पुढे चालणाऱ्या खास दोन बाईक्स असतात. मुकेश अंबानी यांच्या जवळ दोन बुलेटप्रूफ कार आहेत, ज्यातली एक आर्मर्ड BMW 760Li आणि दुसरी मर्सिडीज बेंज S660 गार्ड आहे. मुकेश अंबानी सर्वसाधारणपणे याच कारने फिरतात.

अंबानींच्या सुरक्षेचा खर्च सरकार करतं?

पंतप्रधान, गृहमंत्री तसंच तकाही महत्त्वाचे मंत्री यांच्याशिवाय उद्योगपती किंवा इतर कुणी व्यक्तींना जर विशेष सुरक्षा दिली तर त्याची चर्चा होते. या सुरक्षेसाठी लागणारा पैसा कोम भरणार? असा सवाल लोक विचारत असतात. तसंच या सुरक्षेचा भार सरकारवर पडतो का? असाही प्रश्न लोकांच्या मनात असतो. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षाव्यवस्थेवरुन हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. एकवेळी तर हा प्रश्न थेट सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता. मुंबईमधील एक सीए हिमांशु अग्रवाल यांनी अंबानींच्या Z प्लस सेक्युरिटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतकोर्टात याचिका दाखल केला होती. त्यामध्ये अंबानी यांच्या जीवाला अजिबात धोका नाही, असं सांगत त्यांच्या सुरक्षेव्यवस्थेवरुन होणाऱ्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

इस्रायलचे गार्डही सुरक्षेत तैनात

अंबानी यांच्या सुरक्षा ताफ्यात इस्रायलचे गार्डही असल्याचं सांगण्यात येतं. हे सुरक्षा गार्ड चोवीस तास अंबानी यांच्या सुरक्षेत तैनात असतात असं सूत्रांनी सांगितलं. (Mukesh Ambani has India’s highest security rating)

संबंधित बातम्या:

वाझे, ठाकरे, अंबानी संबंधावर ‘राज’ की बात; राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

VIDEO : देशमुखांची कसून चौकशी करा, आणखी कुणाला किती द्यायला सांगितले?- राज ठाकरे

Raj Thackeray | राज ठाकरेंच्या ‘त्या’ 10 सवालांचं उत्तर देणार का उद्धव ठाकरे सरकार? वाचा ते सवाल

(Mukesh Ambani has India’s highest security rating)

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.