Corona : मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने? 9 दिवसातली रुग्णवाढ नाकी नऊ आणणारी

मुंबईत 21 डिसेंबरला 327 रुग्ण आढळले होते, त्यांची संख्या आज तब्बल 2 हजार 510 वर गेली आहे. मुंबईतली ही स्फोटक रुग्णवाढ राज्याचीही चिंता वाढवणारी आहे.

Corona : मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने? 9 दिवसातली रुग्णवाढ नाकी नऊ आणणारी
BMC
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 9:28 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पूर्वपदावर येत असणारी मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या दिशने निघाली आहे का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय. कारण गेल्या 9 दिवसातल्या रुग्णवाढीचा ग्राफ बघिल्यानंतर तुम्हालाही धडकी भरेल. मुंबईत 21 डिसेंबरला 327 रुग्ण आढळले होते, त्यांची संख्या आज तब्बल 2 हजार 510 वर गेली आहे. मुंबईतली ही स्फोटक रुग्णवाढ राज्याचीही चिंता वाढवणारी आहे. राज्यात आज 3 हजार 900 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, तर गेल्या 24 तासात 20 कोरोना रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे.

मुंबईतील गेल्या 9 दिवसातली कोरोना रुग्णांची आकडेवारी

29 डिसेंबर – 2510 28 डिसेंबर – 1377 27 डिसेंबर – 809 26 डिसेंबर – 922 25 डिसेंबर – 757 24 डिसेंबर – 683 23 डिसेंबर – 602 22 डिसेंबर – 490 21 डिसेंबर – 327

ही आडेवारी पाहिल्यानंतर साहजिकच मुंबई पुन्हा वेगाने लॉकडाऊनच्या दिशेला निघाली आहे का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. मुंबईजवळ ऑमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यापासून मुंबई महापालिका कामाला लागली आहे. मुंबईत पुन्हा काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत, ते निर्बंध आता आणखी कडक होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई महापालिकेने आजच काही नवे नियमही लागू केले आहेत, त्यात हॉटेल व उपहारगृहांचे दैनंदिन सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत. महानगरपालिका आणि पोलीस प्रतिनिधींचे संयुक्त भरारी पथक लक्ष ठेवणार आहे. संयुक्त अरब अमिराती देशांमधून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना आगमन प्रसंगी आरटीपीसीआर चाचणी आणि 7 दिवसाचे क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे. हवाईमार्गे आलेल्या आणि लक्षणे नसलेल्या कोविडबाधित रुग्णांसाठी बीकेसी आणि नेस्को कोविड केंद्रात स्वतंत्र, निःशुल्क विलगीकरण व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मालाड आणि कांजूरमार्ग कोविड केंद्र तत्काळ कार्यान्वित करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.

पुन्हा एकदा प्रभावी मुंबई पॅटर्नची गरज

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत WHO ने कोरोनाला रोखणाऱ्या मुंबई पॅटर्नचे कौतुक केले होते, तसाच मुंबईतला धारावी पॅटर्नही गाजला होता, आता पुन्हा एकदा अशी स्फोटक रुग्णवाढ होऊ लागल्याने पुन्हा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणाऱ्या प्रभावी मुंबई पॅटर्नची गरज निर्माण झाली आहे. अशीच रुग्णवाढ राहिली तर जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट येईल, असा अंदाज तज्ज्ञांनी आधीच वर्तवला आहे आणि त्यामुळे जास्त सतर्क होऊन कोरोनाला रोखण्याची गरज आहे.

ओमिक्रॉनचा विस्फोट! दिवसभरात महाराष्ट्रात तब्बल 87 नवे रुग्ण, तर राज्यात 3900 नव्या कोरोना रुग्णांची भर

Corona | नियम कडक, पण पाळतंय कोण? APMCमध्ये नियमांची पायमल्ली, मार्केट बंद करावं लागणार?

Virat Kohli : एकच चूक वारंवार करून Out होतोय विराट कोहली, सोशल मीडियावर Troll

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.