समुद्राच्या बोगद्यात बुलेट ट्रेन 320 किमीच्या वेगाने धावणार, मुंबईत आल्यावर रेल्वेमंत्र्याचे महत्वाचे अपडेट

Mumbai Ahmedabad Bullet Train | बुलेट ट्रेनसाठी समुद्राच्या खाली 21 KM चा बोगदा करण्यात आला आहे. देशात समुद्रातील बोगद्यातून धावणारी ही पहिली ट्रेन असणार आहे. 21 किलोमीटर लांब बोगद्याला सुरुवात मुंबईतील एचएसआरपासून होणार आहे.

समुद्राच्या बोगद्यात बुलेट ट्रेन 320 किमीच्या वेगाने धावणार, मुंबईत आल्यावर रेल्वेमंत्र्याचे महत्वाचे अपडेट
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी विक्रोळी शाफ्टमध्ये बोगद्याच्या कामासाठी प्रथम रिमोट-नियंत्रित ब्लास्टिंग केले
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 7:18 AM

मुंबई, दि. 25 फेब्रुवारी 2024 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनसंदर्भात महत्वाची बातमी आली आहे. केंद्रीय रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात अपडेट दिले आहे. मुंबईतील विक्रोळी आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील बुलेट ट्रेनच्या बांधकाम सुरु असलेल्या जागेवर अश्विनी वैष्णव पोहचले. त्यांनी कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी सांगितले की, हायस्पीड रेल कॉरिडॉरचा पहिला टप्पा जुलै-ऑगस्ट 2026 मध्ये सुरू होईल. यानंतर हळूहळू इतर टप्पे सुरू होतील. पहिला टप्पा सुरत आणि बिलीमोरा दरम्यानचा असणार आहे.

समुद्राच्या खाली 21 KM बोगदा

बुलेट ट्रेनसाठी समुद्राच्या खाली 21 KM चा बोगदा करण्यात आला आहे. देशात समुद्रातील बोगद्यातून धावणारी ही पहिली ट्रेन असणार आहे. 21 किलोमीटर लांब बोगद्याला सुरुवात मुंबईतील एचएसआरपासून होणार आहे. कल्याण सिलफाटा मार्गाने हा बोगदा जाणार आहे. यामधील 7 किलोमीटरचा भाग ठाणे क्रिकवर समुद्राच्या खाली असणार आहे. बोगदा 40 फूट रुंद असणार आहे. त्यात एक अप आणि एक डाउन लाइन असणार आहे. बोगद्यातून ही ट्रेन 320 किलोमीटर प्रती वेगाने धावणार आहे.

महाराष्ट्रातील काम का रखडले

मुंबईच्या दौऱ्यावर आलेले रेल्वेमंत्री वैष्णव यांनी विक्रोळी शाफ्टमध्ये बोगद्याच्या कामासाठी प्रथम रिमोट-नियंत्रित ब्लास्टिंग केले. यावेळी बुलेट ट्रेनचा संपूर्ण 508 किलोमीटर लांबीचा मार्ग कधी सुरु होणार? हे त्यांनी सांगितले नाही. परंतु पहिला टप्पा जुलै-ऑगस्ट 2026 मध्ये सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात या प्रकल्पास उशीर होण्याचे कारण त्यांनी सांगितले. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने या योजनेसाठी सहकार्य केले नाही. त्यांनी उद्धव ठाकरे सरकारने हे काम थांबवले नसते तर आतापर्यंत बरेच काम झाले असते, असे स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग हा देशातील एकमेव हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प आहे. जपान सरकारच्या सहाय्याने हा प्रकल्प चालवला जात आहे. बुलेट ट्रेन ताशी 320 किलोमीटरच्या वेगाने धावणार असून त्या मार्गावर 12 स्थानके असणार आहेत. दररोज 35 गाड्या धावू शकणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.