मुसळधार पावसाने हाहा:कार, ठाणे स्थानकांवर प्रवाशांचा मोठा खोळंबा, अडीच तासांपासून ट्रेन नाही?

मुसळधार पावसाने मुंबई आणि ठाणे शहरांना अक्षरश: झोडपून काढलं आहे. मुंबई, ठाण्यात रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम पडला आहे. मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनची वाहतूक कोलमडली आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली असून त्यांचे हाल होत आहेत.

मुसळधार पावसाने हाहा:कार, ठाणे स्थानकांवर प्रवाशांचा मोठा खोळंबा, अडीच तासांपासून ट्रेन नाही?
मुसळधार पावसाने हाहा:कार, ठाणे स्थानकांवर प्रवाशांचा मोठा खोळंबा
Follow us
| Updated on: Sep 25, 2024 | 10:28 PM

अखेर ज्याची भीती होती तोच अनुभव मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांना आज येतोय. कारण हवामान विभागाकडून गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जात होता. अखेर मुसळधार पावसाने मुंबई, ठाणे जिल्ह्यांना अक्षरश: झोडपण्यास सुरुवात केली आहे. मुसळधार पावसासह वादळी वारे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विशेष म्हणजे मुसळधार पावसामुळे पहिला धक्का हा मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनला बसला आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला बघायला मिळतोय. कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे रुळावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या भायखळा रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मध्य रेल्वे मार्गावर अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर मुसळधार पाऊस पडतोय. तसेच लोकल ट्रेन खोळंबल्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी ठाणे रेल्वे स्थानकावर आहे. तसेच यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत.

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली नसली तरी अतिशय धिम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावर गेल्या दोन ते अडीत तासांपासून प्रवाशी खोळंबले आहेत. “आम्ही ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी आपल्याला आलेला अनुभव शेअर केला. गेल्या दोन ते अडीच तासांपासून रेल्वे सेवा ठप्प आहे. कुर्ला, सायन परिसरात रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे”, अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली.

आम्ही इतर प्रवाशांची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. “दोन तासांपासून उभी आहे. ट्रेन येते, ट्रेन जाते, काही समजत नाहीय. आता ट्रेनमध्ये चढलो तर चालत्या ट्रेनमधून उतरुन आलो आहोत. काहीच अनाउन्सनमेंट होत नाहीय. बोर्डवरही कोणतीच माहिती दिसत नाही. आता मी राहते विक्रोळीला, तर घरी कसं जावं हेच समजत नाही”, अशी प्रतिक्रिया ठाणे स्थानकावर ट्रेनची वाट पाहत असलेल्या एका तरुणीने दिली.

बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?.
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी.
मुसळधार पावसाचा मध्य आणि पश्चिम रेल्वेला फटका, लोकल विस्कळीत
मुसळधार पावसाचा मध्य आणि पश्चिम रेल्वेला फटका, लोकल विस्कळीत.
'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?
'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?.
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?.
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल.
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं.
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक...
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक....
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान.