वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून प्रवास महागणार, आता १ एप्रिलपासून खिशाला कात्री
Mumbai Bandra Worli sea link Toll: वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी सेतूवर यापूर्वी कार आणि जीपकडून ८५ रुपये घेतले जात होते. ते आता शंभर रुपये झाले आहे. मिनी बसकडून १३० रुपये घेतले जात होते. त्यात ३० रुपयांची वाढ करुन १६० रुपये करण्यात आला आहे.
मुंबई शहरामधील महत्त्वाचा रस्ता ठरलेला वांद्रे-वरळी सागरी मार्गावरुन (Bandra–Worli Sea Link) जाताना आता जादा टोल द्यावा लागणार आहे. अरबी समुद्रावर बांधण्यात आलेल्या या पुलामुळे मुंबईच्या वांद्रे उपनगराला दक्षिण मुंबईच्या वरळीसोबत जोडले जाते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विकसित केलेला हा पूल हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधला आहे. आता वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या खिशाला १ एप्रिलपासून कात्री लागणार आहे. या ठिकाणी टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. पुलावरील पथकरात १५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
अशी केली वाढ
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पथकरात १५ रुपयांची वाढ केली आहे. सागरी सेतूवरुन जाणाऱ्या कारचालकांना १०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून प्रवास करणाऱ्या मिनी बस किंवा तत्सम वाहनांना आता १६० रुपये पथकर भरावा लागणार आहे. तसेच ट्रक आणि बसला २१० रुपये पथकर द्यावा लागेल.
यापूर्वी असे होते दर
वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी सेतूवर यापूर्वी कार आणि जीपकडून ८५ रुपये घेतले जात होते. ते आता शंभर रुपये झाले आहे. मिनी बसकडून १३० रुपये घेतले जात होते. त्यात ३० रुपयांची वाढ करुन १६० रुपये करण्यात आला आहे. तसेच ट्रक किंवा बसकडून पूर्वी १७५ रुपये पथकर घेतला जात होता. तो आता ३५ रुपयांनी वाढवून २१० करण्यात आला आहे.
दर तीन वर्षांना होते वाढ
एमएसआरडीसी’कडून दर तीन वर्षांनी या रस्त्यावरील पथकरात वाढ केली जाते. याआधी एप्रिल २०२१ मध्ये पथकरात वाढ करण्यात आली होती. आता पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच ३१ मार्च २०२७ पर्यंत नवे दर लागू असणार आहे. या सागरी सेतूमुळे मुंबईतील दक्षिणी आणि पश्चिमी भाग जोडला गेला आहे. रास्ते मार्गाने या ठिकाणी जाण्यासाठी 60-90 मिनिटे लागत होते. आता केवळ 6-8 मिनिटे लागतात. 4.8 किलोमीटर लांबीचा हा सागरी सेतू आहे.