Mumbai | दिल्लीला मागे टाकत मुंबई बनले देशातील सर्वाधिक महागडे शहर, वाचा सर्वेक्षणातून नेमके काय पुढे आले!
दरवर्षी होणाऱ्या या सर्वेक्षणात घर, जागा, घरगुती वापराचा वस्तू, अन्नधान्य, पकडे आणि इतर खर्चबद्दल सर्वेक्षण केले जाते. या अगोरद दिल्ली हे देशातील सर्वात महागडे शहर म्हणून ओळखले जायचे. मात्र, यंदाच्या सर्वेक्षणात मुंबईने दिल्लीलाही मागे टाकल्याचे दिसते आहे. दिल्लीत मोबाईल आणि राहणीमानावर सर्वाधिक खर्च केला जातो.
मुंबई : सपनो की नगरी म्हणून मुंबईची (Mumbai) ओळख आहे. जो कोणी मुंबईत येतो, त्याची स्पप्न पूर्ण होतात, असे मुंबईबद्दल कायमच सांगितले जाते. मुंबई हे शहर महाग आहे, इथे घराच्या किंमती जास्त आहेत. महाराष्ट्रात मुंबईनंतर सर्वात महाग शहर पुणे आहे. मुंबईमध्ये जागा, राहणीमान आणि घरांच्या किंमती सर्वात जास्त असल्याचे एका सर्वेक्षणातून (Survey) दिसून आले आहे. मुंबई देशातील सर्वात महागडे शहर आहे, त्यानंतर दिल्ली, चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद अनुक्रमे भारतातील (India) महागडी शहरे आहेत.
जागा आणि घरांच्या किंमती सर्वाधिक
दरवर्षी होणाऱ्या या सर्वेक्षणात घर, जागा, घरगुती वापराचा वस्तू, अन्नधान्य, कपडे आणि इतर खर्चाबद्दल सर्वेक्षण केले जाते. या अगोदर दिल्ली हे देशातील सर्वात महागडे शहर म्हणून ओळखले जायचे. मात्र, यंदाच्या सर्वेक्षणात मुंबईने दिल्लीलाही मागे टाकल्याचे दिसते आहे. दिल्लीत मोबाईल आणि राहणीमानावर सर्वाधिक खर्च केला जातो. सर्वच महागड्या शहरामध्ये लॅपटाॅप, मोबाईल आणि टॅपची मागणी वाढल्याचे दिसते आहे. कोरोनामुळे शाळा बंद होत्या आणि अनेक कंपन्यानी वर्क फाॅम होम दिल्यानेही लॅपटाॅप, मोबाईल यांची मागणी वाढली.
आशिया खंडात सर्वात महागडे शहर हाँगकाँग
आशिया खंडात सर्वात महागडे राहणीमान आणि जीवनशैली ही हाँगकाँगची आहे. त्यानंतर बिजिंग आणि सिंगापूरचा समावेश आहे. मुंबई शहर जरी महागडे असले तरीही राहण्यासाठी मुंबईकडेच लोकांचा जास्त कल असल्याचे देखील सर्वक्षणातून पुढे आले. संपूर्ण देशात बहुराष्ट्रीय कंपन्यांची पहिली पसंती ही मुंबईलाच आहे. देशातील इतर शहरांचा विचार केला असताना मुंबईमध्ये सर्वाधिक कंपन्या आहेत. आयटी क्षेत्रातील कंपन्यांना भारतातील सर्वाधिक सुरक्षित आणि चांगले शहर हे मुंबईच वाटते.