मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीला, काय आहे कारण?

Vidhan Parishad Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यादरम्यान भाजप नेते आशिष शेलार राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीला, काय आहे कारण?
Follow us
| Updated on: May 30, 2024 | 7:35 PM

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. आगामी विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केल्यानंतर मनसेने देखील आपला उमेदवार दिली आहे. मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे.

मनसेचा उमेदवार जाहीर

मनसेने लोकसभा निवडणुकीत भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेने आपला उमेदवारी जाहीर केला आहे. मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघ आता भाजपाचा बालेकिल्ला आहे. येथून भाजपचे निरंजन डावखरे हे आमदार आहेत. ते सलग तिसऱ्यांदा येथून निवडणूक लढवणार आहेत.

मुंबई पदवीधर मतदारसंघातून भाजपाकडून किरण शेलार आणि कोकण पदवीधर मतदार संघासाठी निरंजन डावखरे यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेनेचे डॉ दीपक सावंत यांचे नाव मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी चर्चेत आहे. मुंबईत मनसे उमेदवार देणार की नाही याबाबत अजून स्पष्ट झालेले नाही. मनसे नेत्यांनी म्हटले होते की, महायुतीला दिलेला पाठिंबाहा फक्त लोकसभा निवडणुकीपुरताच मर्यादीत होता. त्यामुळे आता रंजक वाढली आहे. मनसेने जर उमेदवार दिला तर महायुतीला फटका बसू शकतो. त्यामुळे आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्याची शक्यता आहे.

कोण होते आमदार

विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर) किशोर भिकाजी दराडे (नाशिक शिक्षक) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक) यांचा 7 जुलै 2024 रोजी कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे येथे निवडणुका होणार आहेत.

31 मे 2024 रोजी या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. 7 जून 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणारे. 12 जून 2024 पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. 26 जून 2024 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत या चारही मतदारसंघात मतदान होणार आहे. तर १ ते ५ जुलै 2024  पर्यंत ही मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.