भाजपचा शिवसेना भवनावर फटकार मोर्चा, शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड हाणामारी

मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा आयोजित केला आहे.

भाजपचा शिवसेना भवनावर फटकार मोर्चा, शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड हाणामारी
bjp_shiv sena bhawan
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 5:11 PM

मुंबई : मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर (Shiv Sena Bhawan) मोर्चा काढला. अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा आयोजित केला . भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मात्र शिवसेना आमदार सदा सरवणकर हे शिवसैनिकांसह सेनाभवन परिसरात दाखल झाल्याने, परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी या परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. (Mumbai BJP Yuva morcha organize Fatkar Morcha on Shiv Sena Bhawan Dadar, after senas allegations on Ayodhyas Ram Mandir land)

भाजप युवा मोर्चाने सेना भवनावर कूच करताच, शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी धुमश्चक्री झाली. एकमेकांना मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली. पोलिसांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना रोखल्यानंतर शिवसैनिकांनी तिकडे धाव घेतल्यानंतर, दोन्ही पक्षात प्रचंड धुमश्चक्री उडाली.

हे खपवून घेणार नाही, प्रवीण दरेकरांचा इशारा

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे केवळ पक्षाचे अध्यक्ष नाहीत. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पोलिसांच्या उपस्थितीत सरकार आमचं आहे आम्ही वाटेल ती दादागिरी करु, अशी भूमिका असेल तर ती खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रविण दरकेर यांनी दिला आहे. भाजप कार्यालयाबाहेरही आंदोलन झाली. आंदोलकांच्या अंगावर जाणार त्यांना मारहाण करणार, धाक दपटशाह करणं योग्य नाही, मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, असं प्रविण दरेकर म्हणाले. काही कार्यकर्त्यांची कपडे फाडली असल्याचं समोर आलं आहे.

खरं म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून किंबहुना शिवसेना ज्या पद्धतीने पोलिसांना समोर ठेवून गुंडागर्दी. दहशतवाद, मारहाण करण्याचा प्रयत्न करतेय, ते दुर्दैवी आहे. सत्तेचं कळस घेऊन अशाप्रकारच्या या गोष्टी महाराष्ट्रात कधीच झाल्या नाहीत. आमचा आंबेकर नावाच्या पदाधिकाऱ्यावर मारहाण झाली. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. अशा प्रकारची गुंडागर्दी योग्य नाही. अशा प्रकारचा संघर्ष उभा राहिला तर त्याला वेगळं वळण मिळेल. पोलिसांनी नियंत्रण करायला हवं. पण सरकार आमचं आहे, असं म्हणून पोलिसांसमोर वाटेत ती दादागिरी करणं चुकीचं आहे आणि ते खपवून घेणार नाही, असं दरेकर म्हणाले.

अरविंद सावंत यांचं उत्तर

मुळात ज्यांना कायदा-सुव्यवस्था माहिती आहे त्यांनीच कायदा-सुव्यवस्था का बिघडवायची? हा विषय इतका जोरात गाजतोय. तर त्याची चौकशी व्हावी, इतकीच मागणी केली होती. यात दुखावण्यासारखं काय होतं. प्रत्येक गोष्टीवर स्टंटबाजी का करायची? क्रियेला-प्रतिक्रिया असतात. प्रत्येक प्रतिक्रिया संयमी नसतात. चौकशीला घाबरायचं कशाला? घाबरत नाहीत तर रस्त्यावर येण्याची गरज का भासली? असं शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले.

भाजपची पोलिसात तक्रार

भाजप कार्यकर्ते माहिम पोलीस ठाण्यात पोहोचले. विलास आंबेकर, अक्षता तेंडुलकर, सनी साठे, ऋषी शेळमकर या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याची तक्रार आणि गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप कार्यकर्ते माहिम पोलीस ठाण्यात दाखल झाले. भाजपा मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा हे सुद्धा माहिम पोलीस ठाण्यात दाखल पोहोचले.

video : शिवसेना भवनाजवळ सेना-भाजपमध्ये धुमश्चक्री

भाजपचा आरोप काय?

अयोध्येत श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप करून शिवसेना उर्फ ​​सोनिया सेनेने हिंदू धर्म, हिंदू धार्मिक स्थळ आणि हिंदूंच्या श्रद्धा आणि आस्था यांचा अपमान केला आहे. भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईतर्फे शिवसेनेच्या या शुल्लक राजकीय षडयंत्रविरोधात “फटकार मोर्चा” आयोजित करण्यात आला आहे, हा तीव्र निषेध भाजप शिवसेना भवन समोर करत आहे, असं भाजप युवा मोर्चाने म्हटलं आहे.

शिवसेनेची मागणी काय?

राम मंदिरासाठी जगभरातून शेकडो कोटींचा निधी येत आहे. प्रभू रामचंद्राच्या नावानं एकही घोटाळा व्हायला नको. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये भाजपशी संबंधित सदस्य आहेत. शिवसेनेचा एकही सदस्य नाही. रामभक्तांच्या श्रद्धेला तडा जाईल असं काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशायस्पद प्रकरण समोर आलं आहे. ते खरं की खोटं याचा लगेच खुलासा झाला तर बरं. ट्रस्टनं याबाबत खुलासा करायला हवा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती.

राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळय़ाचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे.

आप आमदारांचा दावा 

अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंडाच्या खरेदीचा मोठा गैरव्यवहार झाल्याचा दावा आपचे आमदार संजय सिंह यांनी केला आहे. राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटातच 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केला असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. राम मंदिरासाठीच्या भूखंडाच्या घोटाळ्याच्या आरोपाने देशभर एकच खळबळ उडाली असून ट्रस्टच्या विश्वासहार्यतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत.

आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनी कागदपत्रांच्या हवाल्याने हा आरोप केला आहे. सिंह यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणाची ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणीही केली आहे. केवळ आपच नव्हे तर माजी मंत्री पवन पांडेय यांनीही या घोटाळ्याचा आरोप केला आहे.

संबंधित बातम्या 

Special Report | राम मंदिराच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप!

…तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल : शिवसेना 

हे राम! राम मंदिराच्या भूखंडाचे श्रीखंड, अवघ्या 10 मिनिटात 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी; देशभर खळबळ

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.