Video: मुंबईत ज्यांच्या पोटची बाळं पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये गेली, त्यांच्यावरच आरोग्य समितीच्या अध्यक्षांची अरेरावी, राजुल पटेल माफी मागणार?

पालकांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे असं राजूल पटेल यांना म्हटलं.कसली जबाबदारी स्वीकारयची, काय जबाबदारी स्वीकारायची, तुम्ही इथं अ‌ॅडमिट केलं तेव्हा आम्हाला विचारलं होतं का, असा प्रतिसवाल राजूल पटेल यांनी त्या पालकांना केला.

Video: मुंबईत ज्यांच्या पोटची बाळं पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये गेली, त्यांच्यावरच आरोग्य समितीच्या अध्यक्षांची अरेरावी, राजुल पटेल माफी मागणार?
राजुल पटेल आणि पालक
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 8:22 AM

मुंबई: भांडुप येथील पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये (Bhandup Hospital) चार नवजात बालकांचा (New Born Child) मृत्यू झाला. या मृत्यू पावलेल्या बालकांच्या पालक हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलनाला बसले होते. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल (Rajul Patel)यांनी त्याठिकाणी भेट दिली. या भेटीमध्ये आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांनी पालकांवर आरोप करत यात पालिकेची कोणतीही चुकी नाही असा अजब दावा केलेला.

पोटची बाळं गमावलेल्या पालकांशी अरेरावी

भांडुप येथील रुग्णालयात बाळं गमावलेल्या मुलांचे पालक आंदोलनाला बसले होते. सिद्धार्थ हॉस्पिटल, ओशिवारा हॉस्पिटल, टोपीवाला हॉस्पिटलमध्ये धड सुविधा नाही, आम्हाला दुसरीकडं जावं लागतं, असं पालक सांगतं होते. त्यावर राजुल पटेल म्हणाल्या की प्रसुतीगृहांमध्ये बालरोग तज्ज्ञ महापालिकेला मिळत नाहीत, याची जबाबदारी कुणाची आहे, असं म्हणाल्या. पालकांनी यावर जबाबदारी नाकारत असल्याचं पटेल यांना म्हटलं. जबाबदारी कसं नाकारता म्हणता,कशी जबाबदारी आहे सांगा, निवडून दिलं असं थोडी होतं, असं राजूल पटेल म्हणाल्या. पालकांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे असं राजूल पटेल यांना म्हटलं.कसली जबाबदारी स्वीकारयची, काय जबाबदारी स्वीकारायची, तुम्ही इथं अ‌ॅडमिट केलं तेव्हा आम्हाला विचारलं होतं का, असा प्रतिसवाल राजूल पटेल यांनी त्या पालकांना केला.

चार बाळांचा मृत्यू

मुंबई महापालिकेच्या भांडुप येथील सावित्रीबाई जोतिबा फुले प्रसूतीगृहात गेल्या चार दिवसांत चार बालकांचा अतिदक्षता विभागामध्ये सेप्टिक शॉक लागून मृत्यू झाला होता. तर, अजूनही तीन बालकांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळं कारवाईची मागणी करत पालक रुग्णालयाच्या बाहेर आंदोलनाला बसले होते.

विधानसभेत पडसाद

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भांडुपच्या रुग्णालयात घडलेल्या घटनेवरुन आक्रमक भूमिका घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला या घटनेवरुन खडेबोल सुनावले. रुग्णालयांमध्ये होणाऱ्या दुर्घटनांबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात यावं,अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांची आक्रमक भूमिका पाहता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य आरोग्य अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात येत असल्याची घोषणा केली.

इतर बातम्या:

Mumbai child death : मुंबईत चार दिवसात चार बालकांच्या मृत्यूने खळबळ; भाजप खासदार कोटक पोलिसात तक्रार दाखल करणार

Omicron Update | ओमिक्रॉनचा वाढता धोका! नवी मुंबईच्या एकाच शाळेतील 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, चिंता वाढली

Mumbai BMC Health Committee President Rajul Patel talk with parents who lost their child in higher tone video viral

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.