Mumbai Boat Capsized: मुंबईतील बोट अपघात प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. बोटचालकाचा दावा खोटा ठरवणारी माहिती समोर आली आहे. नीलकमल ही बोट बुधवारी गेट ऑफ इंडियाजवळ समुद्रात बुडाली. या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु नौदलाकडून त्याचा इन्कार करण्यात आला. दरम्यान नीलकमल बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. बोटीची क्षमता ८० असताना त्यातून ११० जण प्रवास करत होते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बोट मालकावर गुन्हा दाखल होणार आहे. दरम्यान या प्रकरणी १३ जणांचा मृत्यू आहे. त्यातील तीन जण नौदलाचे आहे तर दहा नागरिक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, या बोट अपघातात एकच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. नाशिक येथील अहिरे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यात आई, वडील आणि पाच वर्षांचा मुलाचा समावेश आहे. निद्धेश अहिरे असे त्या मुलाचे नाव आहे. हे सर्व जण नाशिकवरून आले होते. परंतु त्यांचे हे शेवटचे पर्यटन ठरले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अपघातात १०१ लोकांना वाचवण्यात आले आहे. संध्याकाळी ७.३० पर्यंतची ही माहिती आहे. अद्याप पूर्ण माहिती मिळाली नाही. या घटनेची नौदल आणि मुंबई पोलीस चौकशी करणार आहे.
मुंबईतील गेट ऑफ इंडियावरुन नीलकमल ही बोट एलिफंटाकडे बुधवारी संध्याकाळी निघाली होती. या बोटीची क्षमत ८० प्रवाश्यांची आहे. परंतु त्या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी होते. एकूण ११० प्रवाशी बोटीत असल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणी बोट मालकावर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली.
बोटीवर तब्बल ११० जण होते अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून (बीएमसी) अधिकृतपणे देण्यात आली. विविध रुग्णालयामध्ये दाखल असलेले प्रवाशी ११० होते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बोटीत असल्याचे सिद्ध झाले. दरम्यान, नीलकमल बोटीला धडकणाऱ्या नौदलाच्या स्पीड बोटीत तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय नौदलाकडून व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात अधिकृत माहिती नौदलाकडून देण्यात येणार आहे.
गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा बोटीला झालेल्या अपघातातील जखमींना उपचारासाठी नवी मुंबईतील जेएनपीए रुण्यालयात दाखल केले आहे. त्यातील एका सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.