आपण अनेकदा विविध स्पर्धा पाहिल्या आहेत. पण कधी तुम्ही कुत्र्यांसाठीची एखादी स्पर्धा पाहिली आहे का? अशी एक अनोखी स्पर्धा मुंबईमध्ये भरवण्यात आली.
मुंबईतील बोरिवलीमधल्या आय सी कॉलनी पेट पार्कमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 300 हून अधिक श्वान सहभागी झाले होते.
याठिकाणी पाळीव श्वानांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 300 हून अधिक श्वान सहभागी झाले होते.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या श्वानांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच श्वान व्यक्तिमत्त्व विकासासाठीही शिबीर आयोजित करण्यात आलं होतं.
माँ फाउंडेशनच्यावतीने भटक्या श्वान तसेच कुत्र्यांच्या लहान पिलांसाठी दत्तक घेण्यासाठी खास सोय करण्यात आली होताी.या दत्तक योजन मध्ये अनेक भटक्या श्वान आणि मांजरींना दत्तक घेण्यात आलं.