Mumbai: वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर अपघात, मनसे आक्रमक, थेट पोलीस स्टेशन गाठलं, FIR नोंदवण्याची मागणी

बोरिवली वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. मनसेचे सरचिटणीस नयन कदम मनसे कार्यकर्त्यांसह कस्तुरबा मार्ग पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत.

Mumbai: वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर अपघात, मनसे आक्रमक, थेट पोलीस स्टेशन गाठलं, FIR नोंदवण्याची मागणी
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 1:10 PM

मुंबई : वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर (Western Express Highway) झालेल्या अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. मनसेचे सरचिटणीस नयन कदम मनसे कार्यकर्त्यांसह कस्तुरबा मार्ग पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत.रस्ता भरणा विभागाविरुद्ध एफआयआर नोंदवण्याच्या मागणी करत आहे. खड्ड्यात पडून दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. जर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी दोन दिवसात हायवेवर पडलेला खड्ड्यांचा संबंधित अधिकारी आणि इंजिनिअरवर कारवाई नाही केली तर मनसेकडून संपूर्ण पश्चिम द्रुतगती महामार्ग जाम करून आंदोलन केला जाणार आहे, अशा इशारा मनसे सरचिटणीस नयन कदम (Nayan Kadam) यांना दिला आहे.

मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचे विरोधात मनसे आक्रमक झालीय. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवली नॅशनल पार्क समोर असलेला उड्डाणपुलावर पडलेला खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एका जोडप्याचा मृत्यू झाला.या खड्ड्यांमुळे काल दोन जणांचा जीव गेल्यामुळे मनसे बोरिवलीमध्ये आक्रमक झाली आहे. मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी मनसेच्या शिष्ट मंडळ घेऊन बोरिवली पूर्वेत कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. हायवेवर पडलेला खड्ड्यांचा संबंधित MSRDC चे अधिकारी आणि इंजिनियरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद व्हावा यासाठी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. मनसेकडून मागणी मुख्यमंत्रीकडे मागणी केली गेली आहे मुख्यमंत्र्यांनी रस्त्याच्या संबंधित अधिकारी आणि इंजिनियरकडून एक कोटी रुपये घेऊन या कुटुंबाला मदत भरपाई केली पाहिजे.

माझा जावई आणि मुलगी दोघेही मरण पावले आहेत, मृत पती-पत्नीची दोन लहान मुले एक मुलगी आहे, जावई आणि मुलगी दोघेही संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवत होते, आता त्यांची काळजी घेणे साठी कोणीही नाही आहे. मृत मुलीच्या आईने सरकारकडे भरपाईची मागणी केली आहे, असं मृत मुलीच्या आईने सांगितलं आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईच्या रस्त्या-रस्त्यावर, जागोजागी खड्डे पडलेले दिसत आहेत. तसंच पश्चिम द्रुतगती महामार्गावरही खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांनी अनेकांचे जीव घेतले आहेत. आताही दोघांचा या रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे दोघांना आपल्या जीवाला मुकावं लागलं. जर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी दोन दिवसात हायवेवर पडलेला खड्ड्यांचा संबंधित अधिकारी आणि इंजिनिअरवर कारवाई नाही केली तर मनसे कडून संपूर्ण पश्चिम द्रुतगती महामार्ग जाम करून आंदोलन केला जाणार आहे, अशा इशारा नयन कदम यांना दिला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.