काहीच ‘बेस्ट’ नाही… मुंबईकरांची माफी मागतो, पण आमच्यावर…; मागण्या मान्य होत नसल्याने बेस्ट कर्मचारी हतबल

आम्हाला वेतनवाढ हवी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना योग्य पोस्ट द्यावी, अशी मागणी रघुनाथ खजूरकर यांनी केली. प्रत्येक मुंबईकरांची मी माफी मागतो. पण आमच्यावर अन्याय होतोय म्हणून इथं येतोय.

काहीच 'बेस्ट' नाही... मुंबईकरांची माफी मागतो, पण आमच्यावर...; मागण्या मान्य होत नसल्याने बेस्ट कर्मचारी हतबल
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 12:53 PM

नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : बेस्टचा आज वर्धापन दिन आहे. पण आजही बेस्टचा संप मिटलेला नाही. कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे आजही रस्त्यावर निम्म्याहून अधिक बसेस उतरलेल्याच नाहीत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक लोक बस स्टँड आणि डेपो बाहेर तास न् तास बसची वाट पाहून वैतागून गेले आहेत. तर काही ठिकाणी बस स्टँडवर प्रवाशांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. तर, दुसरीकडे मुंबईकरांना त्रास होत असल्याबद्दल आम्ही त्यांची माफी मागतो. पण आमच्यावर अन्याय होतोय. त्यामुळे आम्ही मैदानातून हटू शकत नाही, असं संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.

बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनाचा फटका सामान्य मुंबईकरांना बसत असल्याचा आपल्याला पाहायला मिळतो आहे. मुंबईतील 18 आगारातील कर्मचारी काम आंदोलनात सहभागी झाल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसलेला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कंत्राटी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. आंदोलनची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत कर्मचारी आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.मात्र या सर्वांचा मुंबईकराना त्रास सहन करावा लागत आहे.

हे सुद्धा वाचा

आम्हालाही अनुभव आहे, पण…

आमच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. आज मुख्यमंत्री बाहेर असल्यामुळे नरेश म्हस्के आम्हाला भेटणार आहेत. आमच्या अधिवेशनाचा मुद्दा अधिवेशनातही घेण्यात आला आहे.ग आमच्या मागण्या काही मोठ्या नाहीत. सामान्य मागण्या आहेत. जुन्या लोकांना बेस्टमध्ये गलेलठ्ठ पगार आहे. पण तरुणांना नाही. आम्हालाही बेस्टच्या कामाचा अनुभव आहे. पण कमी पगारात काम कसं करायचं?, आंदोलक कंत्राटी कर्मचाीर रघुनाथ खजूरकर यांनी सांगितलं.

आधी एकटाच होतो, आता…

आम्हाला वेतनवाढ हवी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना योग्य पोस्ट द्यावी, अशी मागणी रघुनाथ खजूरकर यांनी केली. प्रत्येक मुंबईकरांची मी माफी मागतो. पण आमच्यावर अन्याय होतोय म्हणून इथं येतोय. सर्वांचा विचार करून आम्ही इथं बसलोय. पहिला मी एकटाच बसलो होतो. आता सर्व कर्मचारी आहेत. दोन दोन दिवसाला आम्ही मेल पाठवत होतो. प्रत्येकाला मेल केला आहे. पण आमच्या मेलची कुणीही दखल घेतली नाही, असंही खजूरकर म्हणाले.

एसटी उतरल्या

आज बेस्टचा वर्धापन दिन आहे. पण अजूनही बेस्टच्या कंत्राटी कामगारांचा संप मिटलेला नाही. निम्म्या बसेस रस्त्यावर उतरलेल्या नाहीत. संपाचा आज सहावा दिवस आहे. पण त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर बेस्टच्या मदतीला एसटी धावून आली आहे.

एसटी महामंडळाच्या तब्बल 150 एसटी बेस्टच्या मार्गावरून चालणार आहेत. तसेच सर्व खासगी वाहतूकदारांना बेस्ट बसेसच्या मार्गावर शेअर प्रवासी वाहतूक सुरू करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

स्थिती काय?

बेस्ट बसेसच्या संपामुळे 18 आगारातील सेवेवर परिणाम

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी ही बेस्टच्या मदतीला धावली आहे

काल एकूण 704 बसेस बंद होत्या. तर 398 बसेस परिवहन संस्थेच्याच कामगारांनी चालवल्या

बेस्टकडे भाडेतत्त्वावरील 1,637 बसेस आहेत, बेस्टच्या मालकीच्या 1,487 बस आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून 6 आगारांमध्ये 150 बसेस उपलब्ध

संप सुरू असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टने स्वत:चे कामगार उतरवले आहेत

कंत्राटदार कंपन्यांनी मागण्या पूर्ण कराव्या

महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते रवी राजा यांनी संपकऱ्यांना फटकारले आहे. बेस्ट बसेसचे कंत्राटी कर्मचारी हे मुंबईकरांना हा संप करून वेठीस धरत आहेत. पगारवाढ आणि इतर सुविधांची त्यांची मागणी आहे. ती मागणी ज्यांनी कंत्राट घेतला आहे त्या कंपन्यांनी पूर्ण करायची आहे. तीन कंपन्यांनी बेस्ट बसेसचे कंत्राट घेतलं. त्यातील 1600 बसेस या मुंबईत सेवा देतात. त्यातील फक्त 600 बसेस सध्या सेवा देत आहेत, अशी माहिती रवी राजा यांनी दिली.

बेस्टचा काय संबंध?

अत्यंत कमी दरात या कंपन्यांनी कंत्राट घेतलं. आता जर कंत्राटी कामगार पगारवाढ मागत असतील तर हा त्या कंपन्यांचा विषय आहे. त्याला बेस्ट प्रशासन आणि राज्य सरकार काय करणार? आता संपावर तोडगा निघावा यासाठी राज्य सरकारने मध्यस्थीची भूमिका घ्यावी. त्यासोबतच बेस्ट प्रशासनाने सुद्धा यामध्ये मार्ग काढावा हीच विनंती आम्ही करत आहोत, असं ते म्हणाले.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.