नसिरुद्दीन शाहांच्या मुलीविरोधात गुन्हा, दवाखान्यातील महिलांना मारहाणीचा आरोप
वेटनरी क्लिनिकने मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहेत. त्याच सीसीटीव्हीच्या आधारावर हीबाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Naseeruddin shah daughter heeba shah).
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांची मुलगी आणि अभिनेत्री हीबा शाहविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या वेटनरी क्लिनिकमध्ये हीबाने महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे (Naseeruddin shah daughter heeba shah). हीबाने कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याचा दावा क्लिनिकने केला आहे. वेटनरी क्लिनिकने मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहेत. त्याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर हीबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Naseeruddin shah daughter heeba shah).
नेमकं काय आहे प्रकरण?
अभिनेत्री हीबा शाहची सुप्रिया शर्मा नावाची एक मैत्रीण आहे. या मैत्रीणीने 16 जानेवारीला तिच्या दोन मांजरींच्या नसबंदीसाठी वेटनरी क्लिनिकला डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती. मात्र काही कारणास्तव ती जाऊ शकणार नव्हती. त्यामुळे तिने हीबाला दोन्ही मांजरींना घेऊन क्लिनिकला जायला सांगितले. सुप्रियाने सांगितल्यानुसार हीबा दोन्ही मांजरींना घेऊन क्लिनिकला गेली.
वेटनरी क्लिनिकने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हीबा 16 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी आली. त्यावेळी क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनी पाच मिनिटे थांबण्याची विनंती केली. कारण त्यावेळी क्लिनिकमध्ये सर्जरी सुरु होती. मात्र हीबाला काही मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर राग आला आणि तिने क्लिकच्या कर्मचाऱ्यांवर आरडाओरड करायला सुरुवात केली. त्यानंतर तिने कर्मचाऱ्यांना धमकी देखील देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, मांजरींवर उपचार करण्यापूर्वी क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनी काही कागदपत्रांवर हीबाची स्वाक्षरी मागितली. त्यावर हीबा जास्त भडकली. ती कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करु लागली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तिला परत जाण्याचा सल्ला दिला. यावरुन तिने क्लिनिकच्या 2 महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केली, असा आरोप क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
या घटनेनंतर वेटनरी क्लिनिकने पोलीसांत तक्रार दाखल केली. सीसीटीव्हीत सर्व प्रकार दिसत असल्यामुळे पोलिसांनी हीबाच्या विरोधात कलम 323, 504 आणि 506 च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.