mumbai coastal road: मुंबईतील 50 मिनिटांचा प्रवास फक्त 8 मिनिटांत, तो ही कोणताही टोल न देता…

Dharmveer Swarajya Rakshak Chhatrapati Sambhaji Maharaj Coastal Road: बहुचर्चित असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील मरीन ड्राईव्हपासून सुरू होता. त्याचा दुसरा भूमिगत बोगदा उत्तर दिशेने जाण्यासाठी आता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. मरीन ड्राईव्ह ते हाजी अली असा एकूण 6.25 Km अंतराचा हा बोगदा पार करण्यासाठी अवघे आठ मिनिटे लागणार आहेत.

mumbai coastal road: मुंबईतील 50 मिनिटांचा प्रवास फक्त 8 मिनिटांत, तो ही कोणताही टोल न देता...
Dharmveer Swarajya Rakshak Chhatrapati Sambhaji Maharaj Coastal Road
Follow us
| Updated on: Jun 10, 2024 | 2:48 PM

मुंबईतील रस्तेमार्गाने होणारी वाहतूक वेळखाऊ असते. मुंबईतील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. अनेक ठिकाणी पूल आणि भुयारी मार्ग तयार होत आहे. आता मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा ४० ते ५० मिनिटांचा प्रवास केवळ ८ मिनिटांमध्ये होणार आहे. मुंबई कोस्टल रोडची दुसरी मार्गिका आता मंगळवारपासून (11 जून) खुली होत आहे. त्यानंतर हा प्रवास जलदगतीने होणार आहे. या मार्गिकेची सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील अनेक प्रकाल्पाचे काम सुरु असल्याचे सांगितले. तसेच कोस्टल रोडचे सर्व टप्पे जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे. या मार्गावरुन जाण्यासाठी कोणताही टोलसुद्धा द्यावा लागणार नाही.

कोस्टल रोड एकूण 10.58 किमी लांबीचा

बहुचर्चित असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील मरीन ड्राईव्हपासून सुरू होता. त्याचा दुसरा भूमिगत बोगदा उत्तर दिशेने जाण्यासाठी आता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. मरीन ड्राईव्ह ते हाजी अली असा एकूण 6.25 Km अंतराचा हा बोगदा पार करण्यासाठी अवघे आठ मिनिटे लागणार आहेत. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना आता जलद गतीने प्रवास करता येणार आहे. यापूर्वी,11 मार्च रोजी वरळी ते मरीन ड्रॉइव्ह दरम्यान असणारा कोस्टल रोडचा पहिला भाग सुरु करण्यात आला होता. हा भाग 9.50 किमी होता. कोस्टल रोड एकूण 10.58 किमी आहे. तो मरीन ड्राइव ते वांद्रे वरळी सी लिंकला जोडला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

शनिवार, रविवारी राहणार बंद

कोस्टल रोडमुळे वरळी वांद्रेच्या दिशेने ताडदेव तसेच पेडर रोडकडे जाणाऱ्या वाहतुकीला फायदा होणार आहे. या बोगद्याच्या माध्यमातून वाहतुकीमुळे वेग येणार आहे. एकूण आठवड्यातील पाच दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार या काळामध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 11 म्हणजे एकूण 16 तास हा बोगदा वाहतुकीसाठी खुला असणार आहे. आठवड्यातील शनिवार आणि रविवारी दोन दिवस प्रकल्पाच्या मेंटेनन्सचे काम केले जाणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.