Matoshree : उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आढळला ‘किंग कोब्रा’, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Kobra Snake in Matoshtree : रविवारी दुपारी मातोश्री बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना हा साप दिसला. त्यानंतर सर्पमित्राला बोलावून सापाला रेस्कू करण्यात आलं होतं . सापाला रेस्क्यू करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होच असलेला पाहायला मिळत आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी कोब्रा साप आढळला. कोब्रा हा अत्यंत सापांंच्या जातीमधील सर्वात विषारी साप आहे. रविवारी दुपारी मातोश्री बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना हा साप दिसला. त्यानंतर सर्पमित्राला बोलावून सापाला रेस्कू करण्यात आलं होतं . सापाला रेस्क्यू करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होच असलेला पाहायला मिळत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये साप हा पाण्याच्या टाकीमागे हा साप बसलेला असल्याचं दिसून आलं. त्यानंतर सर्पमित्राने त्या सापाला बराच वेळानंतर रेस्कू केलं गेलं. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र तेजस ठाकरेही उपस्थित होते. कोब्रा हा साप सर्वात विषारी असतो त्याच्या दंशानंतर जर वेळेवर उपचार नाही मिळाले तर प्राण जाण्याचाही धोका असतो.
सापाला रेक्यू करतानाचा पाहा व्हिडीओ
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी आढळला कोब्रा जातीचा विषारी साप #Matoshree #Kobra #Viralvideo #म pic.twitter.com/HPAq7u04JL
— Harish Malusare (@harish_malusare) August 7, 2023
उद्धव ठाकरे यांना सापाबाबत समजताच ते लगोलग बाहेर आले आणि सापाला रेस्क्यू करताना पाहत होते. रेस्कू करून झाल्यावर सापाचा व्हिडीओ सोशल मीडियीवडर व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आताच काही दिवसांआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधील घरात साप आढळला होता. संजय राऊत आणि त्यांची सकाळची पत्रकार परिषद हे रोजचं ठरलेलंच समीकरण होतं. आता काही प्रणाणात हे कमी झालं नाहीतर आधी रोज सकाळी राऊत पत्रकार परिषद घ्यायचे. अशीच पत्रकार परिषद सुरू असताना त्यांच्या घरात साप आढळल्याने खळबळ उडाली होती.