Mumbai | मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, कोस्टल रोडच्या बोगद्यामधील 1 किमीचा रस्ता तयार!
कोस्टल रोडच्या बोगद्यामधील एक किमीचा रस्ता हा सध्या तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन किमीच्या पहिल्या बोगद्याच्या तीन लेनचा 1 किमी रस्त्याही पूर्ण झाला असून बाकीचे काम प्रगती पथावर सुरू आहे. या बोगद्याच्या लेनची खास बात म्हणजे एक लेन फक्त रुग्णवाहिकेसाठी ठेवण्यात येणार आहे. टनेल बोअरिंग मशीनने दुसरा बोगदाही खोदला आहे.
मुंबई : मुंबईमधील कोस्टल रोडचे (Coastal Road) काम सध्या जोमात सुरू आहे. 2023 पर्यंत कोस्टल रोडचे काम पुर्ण होऊन मुंबईकरांच्या सेवेत कोस्टल रोड दाखल होईल. कोस्टल रोडचे काम पूर्ण झाल्यावर इंधन आणि वेळ दोन्ही मुंबईकरांचे वाचणार हे निश्चित. दोन्ही बाजुच्या वाहतुकीसाठी (Transportation) दोन बोगद्यांचे काम सध्या सुरू आहे. प्रिसेंस स्ट्रीट फ्लाय ओव्हर ते वरळी सी-लिक कोस्टल रोडचे कामही सुरू आहे. समुद्राखाली खोदलेला हा देशातील पहिलाच बोगदा असणार आहे. मुंबईतील (Mumbai) वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी कोस्टल रोड हा महत्वपूर्ण प्रकल्प असणार आहे. यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार.
जमिनीखाली 70 मीटरपर्यंत बोगदे बनवण्याचे काम सुरू
कोस्टल रोडच्या बोगद्यामधील एक किमीचा रस्ता हा सध्या तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन किमीच्या पहिल्या बोगद्याच्या तीन लेनचा 1 किमी रस्त्याही पूर्ण झाला असून बाकीचे काम प्रगती पथावर सुरू आहे. या बोगद्याच्या लेनची खास बात म्हणजे एक लेन फक्त रुग्णवाहिकेसाठी ठेवण्यात येणार आहे. टनेल बोअरिंग मशीनने दुसरा बोगदाही खोदला आहे. प्रियदर्शिनी पार्क ते गिरगाव चौपाटी या बोगद्यांमध्ये तीन लेन राहणार असून जमिनीखाली 70 मीटरपर्यंत बोगदे बनवण्याचे काम सुरू आहे. मुंबईकरांसाठी आनंदाची बाब म्हणजे या प्रकल्पाचे आता जवळपास 55 काम पुर्ण झाले असून बाकीचे उर्वरीत काम सुरूच आहे.
शहरातील वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटणार
बोगद्यांचे काम प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटी मार्गावर सुरू आहे. शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतूक कोडींची समस्या दूर करण्यासाठी प्रियदर्शिनी पार्क ते वरळी सी-लिंकदरम्यान 10.58 किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. कोस्टल रोड हा पालिका उभारत असून त्यासाठी 12 हजार 721 कोटी खर्च येणार आहे. या प्रकल्पात दोन महत्वाचे बोगदे बांधण्यात येणार आहेत. पालिकेने 2018 मध्ये कोस्टल रोडचे काम सुरू केले असून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी चार वर्षांची मुदत देण्यात आली होती. हा प्रकल्प डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे.