दक्षिण कोरियातून 1 लाख किट्स, मुंबई महापालिकेत ‘कोरोना’ग्रस्तांचं रॅपिड टेंस्टिंग
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रॅपिड टेस्टसाठी (Mumbai Corona Rapid Testing) केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
मुंबई : मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Mumbai Corona Rapid Testing) आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. मुंबईत कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता लवकर मुंबईत रॅपिड टेंस्टिंग सुरु होणार आहे. यासाठी मुंबई महापालिका दक्षिण कोरियाकडून 1 लाख किट्स विकत घेणार आहे
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रॅपिड टेस्टसाठी (Mumbai Corona Rapid Testing) केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक रुग्ण असलेल्या मुंबईत लवकरच रॅपिड टेस्ट होणार आहे. यासाठी मुंबई महापालिका दक्षिण कोरियातून एक लाख किट्स विकत घेणार आहे. दक्षिण कोरियातून हे किट्स आल्यानंतर मुंबईत रॅपिड टेस्टिंगला सुरुवात होईल.
या रॅपिड टेस्टमुळे एखाद्या व्यक्तीला इन्फेक्शन झालं आहे का याची तात्काळ माहिती मिळणार आहे. जर एखाद्याला इन्फेक्शन झालं असेल तर त्याची लगेचच कोरोना चाचणी केली जाणार आहे.
कोरोना विषाणूंच्या निदानासाठी नाक आणि घशातील स्वॅब गरजेचे आहेत. तसेच काही इतर चाचण्या केल्या जातात. याचा रिपोर्ट येण्यासाठी फार कालावधी लागतो. मात्र रॅपिड टेस्टिंग किटमुळे कोरोनाचे निदान फक्त 30 मिनिटात होऊ शकते असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. यासाठी फक्त रक्ताचे नमुने तपासावे (Mumbai Corona Rapid Testing) लागतात.
महाराष्ट्रात कोरोनाचा हाहा:कार
कोरोना विषाणूने देशासह राज्यात हाहा:कार पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढतच आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 1 हजार 297 वर पोहोचला आहे.
आज मुंबईत 143 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. तर त्यापाठोपाठ पुणे 3, पिंपरी चिंचवड 2, यवतमाळ 1, अहमदनगर 3, ठाणे 1, नवी मुंबई 2, कल्याण डोंबिवली 4, मिरा-भाईंदर 1, वसई विरार 1, सिंधुदुर्ग 1 कोरोना रुग्णांची वाढ झाली (Sindhudurg Corona Patient tested negative) आहे.