Mumbai Corona | 4 दिवसानंतर अचानकपणे वाढ! मुंबईत 16420 नवे कोरोनाग्रस्त, पॉझिटिव्हीटी दर 24.3 टक्क्यांवर, चिंता वाढली
बुधवारी या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. बुधवारी मुंईत 16420 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. चार दिवसांपासून रुग्णसंख्येत घट आढळली असताना आता पाचव्या दिवशी पॉझिटिव्हीटी दर थेट 24.3% टक्क्यांवर पोहोचला आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने हाहा:कार माजविलेला असताना राजधानी मुंबईमध्येही (Mumbai) चिंतेचे ढग गडद होत आहेत. मागील चार दिवसांपासून मुंबईमध्ये कोरोना (Corona) रुग्णांची संख्या कमी झाल्याचे नोंदवले गेले होते. मात्र बुधवारी या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. बुधवारी मुंईत 16420 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. चार दिवसांपासून रुग्णसंख्येत घट आढळली असताना आता पाचव्या दिवशी पॉझिटिव्हीटी दर (Positivity Rate) थेट 24.3% टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील कोरोना संसर्गाची स्थितीही अशीच आहे. अचानकपणे वाढलेले हे रुग्ण मुंबईकरांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत.
बुधवारी कोरोनाग्रस्तांचा आकडा अचानकपणे वाढला
मुंबईमध्ये मागील चार दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे कोरोना संसर्ग आटोक्यात येत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले. मात्र बुधावरी हे निरीक्षण फोल ठरले. बुधवारी कोरोनाग्रस्तांचा आकडा अचानकपणे वाढला. येथे दिवसभरात तब्बल 16,420 नवे कोरोना रुग्ण आढळले. तसेच 7 जणांचा मृत्यू झाला. या रुग्णवाढीनंतर मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर तब्बल 18.7 टक्क्यांवरुन थेट 24.3 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्णसंख्या कमी झाली म्हणून कोरोना नियम पाळण्यात हयगय करु नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. मात्र आता पुन्हा एकदा रुग्ण वाढल्यामुळे चिंतेत भरच पडली आहे.
राज्यातही दिवसभरात 46,723 नवे कोरोनाग्रस्त
राज्यातदेखील कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. राज्यात हा दर 35.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. बुधवारी राज्यात 46,723 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. मंगळवारी हाच आकडा 34,424 वर होता. विशेष म्हणजे राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्येही भर पडताना दिसत आहे. मंगळवारी कोरोनामुळे 22 बाधितांचा मृत्यू झाला होता. आता हाच आकडा बुधवारी 32 वर पोहोचला आहे. म्हणजेच रुग्णसंख्या वाढत असता मृतांचा आकडादेखील वाढताना दिसतोय. त्यामुळे आगामी काळात नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळावेत असे आवाहन केले जात आहे.
#CoronavirusUpdates 12th January, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) – 16420 Discharged Pts. (24 hrs) – 14649
Total Recovered Pts. – 8,34,962
Overall Recovery Rate – 87%
Total Active Pts. – 1,02,282
Doubling Rate – 36 Days
Growth Rate (5 Jan – 11Jan)- 1.85%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 12, 2022
मुंबईत मागील चार दिवसांची काय स्थिती ?
मुंबईत मागील चार दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत होती. 7 जानेवारी रोजी 20,971 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर 8 जानेवारी रोजी हा आकडा 20,318 पर्यंत खाली आला होता. 9 जानेवारीला रुग्णसंख्या 13,648 एवढी नोंदवली गेली होती. तर 11 जानेवारीला रुग्णसंख्या 14.6 टक्क्यांनी कमी होऊन फक्त 11,647 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. मात्र बुधवारी हा आकडा दिवसभरात अचानकपणे 40 टक्क्यांनी वाढला असून 16,420 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली.
इतर बातम्या :
कोरोनापासून वाचण्यासाठी N95 मास्कची चर्चा, असा ओळखा बनावट आणि खऱ्या मास्कमधील फरक