Mumbai Corona Update | मुंबईत दिवसभरात 809 नव्या कोरोना रुग्णांची नोद, 3 जणांचा मृत्यू, संकट वाढले ?
मुंबईत आज 809 कोरोना रुग्णांची नोंद झाली तर आज दिवसभरात मुंबईत 335 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. विशेष म्हणजे मुंबई पालिका क्षेत्रात आज तिघांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत : राज्यात कोरोनाचे संकट गहिरे होत असताना मुंबईतदेखील बाधितांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. डिसेंबर महिन्यात मुंबईतील रुग्णआलेख वाढला असून खबरदारी घेण्याची आवाहन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत आज 809 कोरोना रुग्णांची नोंद झाली तर आज दिवसभरात मुंबईत 335 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. विशेष म्हणजे मुंबई पालिका क्षेत्रात आज तिघांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांची स्थिती काय ?
मुंबईत आज दिवसभरात 809 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर दिवसभरात 335 बाधित कोरोनामुक्त झाले. मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 97% असून सध्या मुंबई पालिका क्षेत्रात 4765 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्णदुपटीचा दर 967 दिवस असून रुग्णवाढीचा दर 0.07 टक्के आहे. दिवसभरात तीन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. यामध्ये एक पुरुष तर दोन महिला रुग्ण होते. तिनही रुग्णांना दीर्घकालीन आजार असल्याचे सांगण्यात आले आहे.
#CoronavirusUpdates 27th December, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) – 809 Discharged Pts. (24 hrs) – 335
Total Recovered Pts. – 7,48,199
Overall Recovery Rate – 97%
Total Active Pts. – 4765
Doubling Rate – 967 Days Growth Rate (20 Dec – 26 Dec)- 0.07%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 27, 2021
डिसेंबर महिन्यात रुग्णसंख्येत वाढ
मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. 14 डिसेंबर रोजी 225 कोरोना रुग्ण आढळले होते. 23 डिसेंबर रोजी मुंबईत सक्रिय कोरोनाग्रस्तांचा आकडा 600 पर्यंत पोहोचला होता. 26 डिसेंबर रोजी हाच आकडा 922 वर पोहोचला.
डिसेंबर महिन्यातील कोरोना रुग्णांची स्थिती
14 डिसेंबर- 225 रुग्ण
15 डिसेंबर- 238 रुग्ण
16 डिसेंबर- 279 रुग्ण
17 डिसेंबर- 295 रुग्ण
18 डिसेंबर- 283 रुग्ण
19 डिसेंबर- 336 रुग्ण
20 डिसेंबर- 204 रुग्ण
21 डिसेंबर- 327 रुग्ण
22. डिसेंबर- 490 रुग्ण
23. डिसेंबर- 602 रुग्ण
24. डिसेंबर- 683 रुग्ण
25. डिसेंबर- 757 रुग्ण
26. डिसेंबर-922 रुग्ण
27. डिसेंबर-809 रुग्ण
लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज
दरम्यान, कोविडचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन दिवसांत आयोजित करावी असेही त्यांनी निर्देश त्यांनी दिले आहेत.
इतर बातम्या :