मुंबईत ‘डोअर टू डोअर’ कोरोना लसीकरण, सोसायटीमध्ये लसीकरणाला सुरुवात
मुंबईतील एका सोसायटीमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. (Mumbai Corona vaccination in society)
मुंबई : मुंबईकरांना राहत्या घरी कोरोनाची लस देण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केली जात होती. काही दिवसांपूर्वी मुंबईत डोअर टू डोअर लस देण्याला सुरुवात झाली आहे. मुंबईतील एका सोसायटीमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे सोसायटीमध्ये लसीकरण करणारी मुंबई महापालिका पहिली महापालिका ठरली आहे. (Mumbai Corona vaccination started in a society)
डोअर टू डोअर कोरोना लस मिळण्यास सुरुवात
मुंबईतील गोवंडी पूर्व भागातील रहेजा सोसायटीमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना डोअर टू डोअर कोरोना लस मिळण्यास सुरुवात झाली आहे.
रहेजा सोसायटीत सर्वप्रथम लसीकरण
काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने सोसायटयांना खासगी रुग्णालयासोबत करार करून लसीकरण करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार मुंबईतील रहेजा सोसायटीने करार केला आहे. यामुळे रहेजा सोसायटीतील रहिवासी, ड्रायव्हर, घर काम काम करणाऱ्या महिला यांचे लसीकरण केलं जातं आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सोसायटीमध्ये लसीकरण करणारी मुंबई महापालिका पहिली पालिका
मुंबईत सोसायटीमध्ये लसीकरण करणारी मुंबई महापालिका पहिली पालिका ठरली आहे. यामुळे लसीकरणचा वेग वाढणार आहे, असे खासदार राहुल शेवाळे म्हणाले. तसेच मुंबईत कोरोना लसीकरणाचा तुटवडा लक्षात घेता याबाबतचे ग्लोबल टेंडर काढलं आहे. एकदा लस मिळाली की मोठ्या प्रमाणात लसीकरण होईल. त्यानंतर मग सोसायटींना मोफत लस देण्याबाबतचा विचार करु, असेही राहुल शेवाळे सांगितले.
लस मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेची धडपड
राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. कोरोना प्रतिबंधक लसींच्या (Corona Vaccine) तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडर मधून एका पुरवठादारानं माघार घेतली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर लस मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर जगातील 6 सिस्टर सिटीजने मुंबई महापालिकेला कोरोना लस पुरवावी, अशी मागणी केली आहे. (Mumbai Corona vaccination started in a society)
उद्या (२९ मे, २०२१) कोव्हॅक्सीन लस देणाऱ्या लसीकरण केंद्रांची यादी.
केवळ ४५+ वयाच्या नागरिकांना लस देण्यात येईल. केवळ दुसरा डोस उपलब्ध.
कृपया पहिल्या डोसचे प्रमाणपत्र आणायला विसरू नका.
१००% लसीकरण ऑनलाईन नोंदणीच्या माध्यमातून.
वेळ: सकाळी १० ते दु. ३#MyBMCVaccinationUpdate https://t.co/kZ3XJKvc2M pic.twitter.com/RkPv2ry4Kj
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 28, 2021
संबंधित बातम्या :
Corona Vaccination | मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्यांचे Walk In लसीकरण
मुंबई महापालिकेचं एक पाऊल पुढे, लसीसाठी ग्लोबल टेंडर काढलं, 1 कोटी डोसची मागणी