Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होळी खेळून घरी अंघोळ करायला गेले अन् दोघांचे मृतदेहच बाहेर आले; आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नेमकं काय घडलं?

गिझरचा गॅस लिक झाल्याने या दोघांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक अंदाज आहे, असं पोलिसांनी सांगितलं. मृतदेहांचे पोस्टमार्टम केल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण समजणार आहे.

होळी खेळून घरी अंघोळ करायला गेले अन् दोघांचे मृतदेहच बाहेर आले; आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नेमकं काय घडलं?
mumbai policeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 6:31 AM

मुंबई : एक अत्यंत काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. धुळवडीच्या दिवशी आंघोळ करत असताना गिझरचा गॅस लिक झाल्याने पती पत्नीचा मृत्यू झाला. घाटकोपरच्या कुकरेजा टॉवरमध्ये ही दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत दाम्पत्यांचे मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास करत आहेत.

दीपक शाह (40) आणि टीना शाह (35) असं या दाम्पत्याचं नाव आहे. दीपक शाह हे कुकरेजा टॉवरमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. त्यांचे नातेवाईकही याच टॉवरमध्ये राहतात. धुळवडीच्या दिवशी त्यांचे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी आले होते. बराच वेळ दरवाजा ठोठावला तरीही आतून काहीच आवाज आला नाही. कुणीही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे या नातेवाईकाला काही तरी गडबड झाल्याचा संशय आला. त्यांनी लगेच पोलिसांना सूचना केली. त्यानंतर पोलिसांनी घटना स्थळी येऊन ड्युप्लिकेट चावीने फ्लॅटचा दरवाजा उघडला.

हे सुद्धा वाचा

गिझर सुरू केला अन्

दरवाजा उघडल्यानंतर समोरचं दृश्य पाहून सर्वच हादरून गेले. दोन्ही पती पत्नी निपचित पडलेले आढळले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी या दोघांनाही मृत घोषित केले. याबाबत पोलिसांनी शेजाऱ्यांची विचारपूस केली. तेव्हा शाह पती पत्नी दोघेही थोड्याच वेळापूर्वी धुळवड खेळून घरी आंघोळीला गेल्याचं समजलं. घरी गेल्यावर त्यांनी आंघोळीसाठी पाणी गरम करण्याकरिता गिझर सुरू केला. मात्र, अचानक गिझरमधून गॅस गळती सुरू झाली. त्यामुळे दोघेही बाथरूममध्येच गॅसच्या संपर्कात आले आणि जीव गुदमरल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

शवविच्छेदन अहवालातून माहिती येईल

गिझरचा गॅस लिक झाल्याने या दोघांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक अंदाज आहे, असं पोलिसांनी सांगितलं. मृतदेहांचे पोस्टमार्टम केल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण समजणार आहे. पोस्टमार्टम आणि विसेरा रिपोर्ट आल्यानंतरच या दोघांच्याही मृत्यूचं नेमकं कारण उघड होईल. सध्या पोलीस या दोन्ही रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी या दोघांच्याही कुटुंबीयांना शाह पती पत्नीच्या मृत्यूची माहिती कळवली आहे.

गाझियाबादमध्येही असंच घडलं होतं

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्येही अशीच एक घटना घडली आहे. गाझियाबादच्या मुरादनगरमध्ये अग्रसेन मार्केटमध्ये धुळवडीच्या दिवशी बाथरूममध्ये अंघोळ करत असताना गिझरमधून गॅस लिक झाल्याने दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा तोडून दोघांचे मृतदेह बाहेर काढले होते. पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर पोलीस याबाबत पुढील कारवाई करणार आहे.

आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण
आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण.
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल.
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका.
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे.
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?.
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद.
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण...
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण....