मुंबई: मुंबईत लॉकडाऊन लागू झाला तर काय होणार? याबाबत चिंता वाटणे साहजिकच आहे. लॉकडाऊन लागू होणार हे ऐकल्याने अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. त्यामुळे लोक चिंतेत आहेत. अनेकांना नोकरी, धंदा आणि रोजगार बुडण्याची चिंता वाटत आहे. मात्र, मुंबईत खरोखरच लॉकडाऊन न झाल्यास काय होईल, याचा घेतलेला हा आढावा… (Mumbai COVID lockdown threatens more economic pain)
मुंबई थांबली तर देश थांबला
मुंबई केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही, तर देशाचं आर्थिक हब आहे. मुंबईत महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा व्यवहार चालतो. मुंबईची 300 अब्जाची जीडीपी आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशालाही आर्थिक बळ मिळतं. संपूर्ण देशाची जीडीपी पाहिली तर एकट्या मुंबईचा त्यात पाच टक्के वाटा आहे. येथील सर्व्हिस सेक्टर अत्यंत महत्वाचा आहे. त्याचा वर्षाला 4 लाख कोटींचा टर्नओव्हर आहे. जर लॉकडाऊन लागला तर आर्धी सर्व्हिस इंडस्ट्री बंद होईल. त्यामुळे महिन्याला 16 हजार कोटींचं नुकसान होऊ शकतं.
मुंबईत काय काय बंद होईल
मुंबईत सध्या आवश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यात हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल, थिएटर, सलून, जीम, पार्लर, कपडे, चपला, खेळण्याची दुकाने, ज्वेलरी आणि फर्निचर्स स्टोअर्स 30 एप्रिलपर्यंत बंद आहेत. बीएसीच्या आकडेवारी नुसार मुंबईत 9.9 लाख नोंदणीकृत दुकाने, मॉल आदी आहेत. त्यात 3.17 लाख दुकाने, 5.74 लाख व्यावसायिक प्रतिष्ठाने, 15080 रेस्टॉरंट आणि 897 थिएटर आहेत. अनेक निर्बंधामुळे यातील 80 टक्के गोष्टी बंद आहेत.
व्यापाऱ्यांचा विरोध का?
लॉकडाऊनचं संकट घोंघावू लागल्याने व्यापारी भयभीत झाले असून त्यांच्यात संतापाचे वातावरण आहे. मागच्या लॉकडाऊनमध्ये पोळून निघाल्याने त्यांनी नव्या लॉकडाऊनला विरोध केला आहे. मागच्या लॉकडाऊनमध्ये 8 महिने दुकानांसहीत सर्व व्यापार बंद होता. या महिन्यात पुन्हा एकदा व्यापाऱ्यांवर लॉकडाऊनचं संकट ओढवलं आहे. त्यामुळे व्यापारी घाबरले आहेत. आता लॉकडाऊन सारखेच निर्बंध लावण्यात आले आहेत. जवळपास सर्व दुकाने बंद आहेत. पोलीसही दुकाने बंद करत आहेत. त्यामुळेच दुकानदार आणि व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत. कोरोना गाईडलाईनच मोठं संकट असल्याचं ते सांगत आहेत. तर, राज्य सरकारने सर्व कामगारांचं तात्काळ लसीकरण करून घेण्याचं आवाहन केलं आहे. तर, कार्यालयातील, उद्योगातील अधिक लोक 45 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची लस देण्यात यावी, असं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
लॉकडाऊनचे दुष्परिणाम कसे?
गेल्या वर्षी लॉकडाऊनने रिटेल आणि उद्योगांना सर्वाधिक प्रभावित केलं होतं. अजूनही उद्योगांवर परिणाम झालेला आहे. मात्र, हळूहळू काम सुरू आहे. त्यातच नवी नियमावली आली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंटला सर्वाधिक फटका बसला आहे. महाराष्ट्रातील 20 टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंट अजूनही बंद आहेत. मागच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक डबघाईमुळे 30 टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंट कायमचे बंद झाले होते.
लाखो लोकांवर संकट
महाराष्ट्रात सुमारे 30 लाख कर्मचारी हॉटेल इंडस्ट्रीत काम करतात. एका आकडेवारीनुसार यातील 40 टक्के लोकांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. कोरोना संकटानंतर हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे. रिेटेल सेक्टरचीही हीच परिस्थिती आहे. मुंबईत 10 लाखाहून अधिक अकूशल कामगार काम करत असतात. त्यातील अनेक लोकांची नोकरी जाणार असून अनेकांचे पगार कापले जाणार आहेत. बहुतेक दुकानेही भाड्याने घेतलेली आहेत, त्यामुळे भाडं कसं द्यावं हा प्रश्नही त्यांना सतावत आहे. (Mumbai COVID lockdown threatens more economic pain)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 SuperFast News | 8 AM | 12 April 2021 https://t.co/cvDoUSh8b3
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 12, 2021
संबंधित बातम्या:
लोकांना घरात बंद करून, काही साध्य होणार नाही, प्रभावी उपाययोजना करा; भाजपचा लॉकडाऊनला विरोध कायम
(Mumbai COVID lockdown threatens more economic pain)