मुंबईत लसीकरणाची गती मंदावली, रोज किती टक्के डोस राहतात शिल्लक ? महापालिका राबवणार नवीन उपक्रम
मिशन कवच कुंडल मोहिमेनुसार प्रतिदिन मुंबईत 1 लाख 50 हजार ते २ लाख लोकांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे मात्र सध्या मुंबईत प्रतिदिन लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असूनही सार्वजनिक लसीकरण केंद्रावर फक्त 50 ते 90 हजार लोकांचे लसीकरण होत आहे. हेच लक्षात घेत मुंबई महानगरपालिके ने आता लसीकरणासाठी लोकांनी पुढे येण्यासाठी उपक्रम सुरु केले आहेत. (mumbai covid vaccination)
मुंबई- (देवश्री भुजबळ) मुंबई महानगरपालिकेच्या असे निदर्शनास आले आहे कि गेले मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग मंदावलेला आहे. मागच्या काही महिने मुंबईत लसीकरण चांगल्या वेगाने चालू होते व मुंबईकरांचा लसीकरणाचा उत्साह असा होता कि लसी कमी पडत होत्या. मात्र गेले काही दिवस जवळपास ५० टक्क्यांनी लसीकरणाची गती मंदावली आहे आणि मुंबई महानारपालिका आता लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम सुरु करतेय. देशात पुढच्या काही महिन्यात १०० % लसीकरण पूर्ण करण्याचे उद्धिष्ट असताना मुंबईत लसीकरणाचा वेग मंदावणे हि गंभीर बाब आहे. (mumbai covid vaccination)
मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली आणि 12 ऑक्टोबर 2021 पर्यंत जवळपास 1 कोटी 29 लाख लसींच्या मात्रा देण्यात आलेल्या आहेत. मिशन कवच कुंडल मोहिमेनुसार प्रतिदिन मुंबईत 1 लाख 50 हजार ते २ लाख लोकांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे मात्र सध्या मुंबईत प्रतिदिन लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असूनही सार्वजनिक लसीकरण केंद्रावर फक्त 50 ते 90 हजार लोकांचे लसीकरण होत आहे. हेच लक्ष्यात घेत मुंबई महानगरपालिके ने आता लसीकरणासाठी लोकांनी पुढे येण्यासाठी उपक्रम सुरु केले आहेत.
लसीकरण गतिमान करण्यासाठी काय करणार-
12 ऑक्टोबर च्या पत्रकानुसार आयुक्तांनी मुंबईतल्या सगळ्या प्रभागांना निर्देश दिले आहेत कि ठराविक इमारतींचे गट पाडून लसीकरण निश्चितकरण्यात यावे. मुंबईत झोपडपट्ट्या व काही सामूहिक इमारतींसाठी सार्वजनिक जागेवर तात्पुरते लसीकरण केंद्र उपलब्ध करून देण्याची महापालिका योजना आखात आहे. महिला, विद्यार्थीं , वंचित गट इत्यादी करीत विशेष लसीकरण सत्र आयोजन, गरज असल्यास लसीकरण केंद्रावरील वेळेत व सत्रात फेर बदल असे काही उपक्रम मुंबईत लसीकरण गतिमान करण्यासाठी राबविण्यात येतील.
सर्वात महत्वाचा म्हणजे मुंबईत ज्या सोसायट्यांमध्ये सर्व पात्र लोकांचे 100 टक्के लसीकरण झालेले आहे, त्या सोसायटीच्या गेट वर “100% लसीकृत” असे पोस्टर लावण्यात येईल. मुंबईतल्या सर्व वॉर्ड्सने इमारतींना किती रहिवास्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे हे कळविण्यास सांगितलेले आहे. पुढच्या काही दिवसात माहिती प्राप्त होताच ज्या इमारतीच्या पात्र रहिवास्यांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे तिथे मुंबई महानारपालिके तर्फे पोस्टर लावले जातील.
का मंदावला लसीकरणाचा वेग-
नवरात्रीत लसीकरणाचा गती कमी झाल्याचं निर्देशनास आलं. गणपती पर्यंत लसीकरणासाठी लोक पुढे येत होते मात्र या महिन्यात रोजचे जवळपास 50 टक्के लसींच्या मात्र शिल्लक राहतायेत. पहिला आणि दुसऱ्या डोस मध्ये जास्त दिवसांचा अंतर असल्याने देखील दुसऱ्या डोस साठी लोक कमी येतात. अजूनही काही लोक लास घेण्याच्या विरोधात आहेत व लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची देखील गरज आहे, असं मुंबई महानारपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाराने सांगितलं.
इतर बातम्या :
3 महिन्यांसाठी सायन फ्लायओव्हर वीकएंडला बंद ! गाड्यांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांचे हाल होणार