कल्याणमध्ये मतदान आठवड्याभरात, आता भर गर्दीत बंदूक घेऊन फिरणारे कोण ?

Mumbai Thane Crime News: कल्याणमध्ये दोन दिवसांपूर्वी बाजारपेठ पोलिसांनी कमरेला गावठी कट्टा लावून बाजारात फिरत असलेल्या केतन बोराडे नावाच्या आरोपीला बेड्या ठोकल्या. हा आरोपी एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर 21 गुन्हे दाखल दाखल आहेत. या गोष्टीला 24 तास पूर्ण होण्याच्या आधी आता कल्याण पश्चिममध्ये स्टेशन परिसरात एका तरुणास अटक केली.

कल्याणमध्ये मतदान आठवड्याभरात, आता भर गर्दीत बंदूक घेऊन फिरणारे कोण ?
crime
Follow us
| Updated on: May 14, 2024 | 12:37 PM

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान 20 तारखेला होणार आहे. पाचव्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार व निवडणूक रंगात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस आणि प्रशासन सतर्क झाले आहे. शहरात गस्ती वाढवल्या जात आहेत. पोलिसांच्या गस्ती दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर कल्याणमध्ये दोन दिवसांत गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

केतन बोराडे आणि सोनू झा असे या आरोपीची नावे आहे. दोघांकडून गावठी कट्टा, दोन मॅक्झिन, 7 जिवंत काडतूसे कल्याण बाजारपेठ पोलिसांनी जप्त केले आहेत. मात्र अशा प्रकारे खुले आम आरोपी भर गर्दीत बंदूक घेऊन फिरत असल्याने कल्याणमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बंदूक घेऊन फिरणारे कोण ? त्यांना कुठला राजकीय सपोर्ट आहे का? कल्याणमध्ये चालंलय तरी काय ? असा सवाल आत्ता उपस्थित होत आहे.

24 तासात दुसरी घटना

कल्याणमध्ये दोन दिवसांपूर्वी बाजारपेठ पोलिसांनी कमरेला गावठी कट्टा लावून बाजारात फिरत असलेल्या केतन बोराडे नावाच्या आरोपीला बेड्या ठोकल्या. हा आरोपी एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर 21 गुन्हे दाखल दाखल आहेत. या गोष्टीला 24 तास पूर्ण होण्याच्या आधी आता कल्याण पश्चिममध्ये स्टेशन परिसरात एका तरुणास अटक केली. कल्याणमध्ये पोलिसांनी सापळा रचत सोनू झा नावाच्या तरुणाला अटक केली. सोनू झा हा मूळचा बिहारचा राहणारा आहे. तो एटीएम एक्सचेंजचा गुन्हा करत असून यात तो पकडला गेला आहे.

हे सुद्धा वाचा

का वापरत होता सोनू बंदूक

सोनू झा बंदूक दाखवून समोरच्या व्यक्तिला घाबरवून पळ काढत होता. त्यासाठी तो गावठी कट्टयाचा वापर करीत होता. सध्या या दोन्ही आरोपींकडून दोन गावठी कट्टा, दोन मॅक्झिन, 7 जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले आहेत. परंतु खुले आम आरोपी भर गर्दीत बंदूक घेऊन फिरत असल्याने कल्याण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बंदूक घेऊन फिरणारे कोण ? या लोकांना कुठला राजकीय सपोर्ट आहे का? कल्याणमध्ये चालंलय तरी काय ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.