‘या’ दोघांचं एकच काम, घुसायचं, अन् फोडायचं; किती एटीएम फोडली असतील पाहा तर…

मुंबईमध्ये कामासाठी म्हणून आलेल्या दोघा उत्तर प्रदेशमधील युवकांना चोरी करण्याचा अजबच फंडा शोधून काढला. एटीएममध्ये घुसायचं आणि एटीएम फोडायचं एवढचं काम करायचं. अशी एटीएम त्यांनी एक नाही दोन नाही तर तब्बल 20 च्या वरती एटीएम फोडली आहेत.

'या' दोघांचं एकच काम, घुसायचं, अन् फोडायचं;  किती एटीएम फोडली असतील पाहा तर...
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 6:33 PM

मुंबई : बेसिन कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह बँकेचे एटीएममध्ये घुसून मनी डिस्पेंस पट्टी तोडून एटीएममधील रोख रक्कम चोरी करणाऱ्या टोळीला आज पोलिसांनी अटक केली. यामधील सर्व आरोपी हे उत्तर प्रदेशमधील प्रतापगड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे एमएचबी कॉलनीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी सांगितले. या टोळीचे असेच चार गुन्हे केल्याचेही उघडकीस आले आहेत. आज (दि.5 रोजी) दुपारी बेसिन कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह बँकेच्या एटीएममध्ये बोरवली पश्चिम या ठिकाणी दोघा अनोळखी व्यक्तीकडून एटीएममध्ये घुसून स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने मशीनमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी या दोघांनी एटीएमच्या बाहेर थांबून नंतर एटीएम फोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यावेळी त्यांनी बँकेच्या आलेल्या ग्राहकाला पैसे काढण्यासाठी त्यानी त्या व्यक्तीला आत जाऊ दिले मात्र त्याचे पैसे निघाले नसल्याने तो व्यक्ती निघून गेला.

त्यानंतर या दोघांनी पुन्हा आतमध्ये येऊन एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यावेळी त्यांचा प्रयत्न फसल्याने ते दोघांनी तिथून पळ काढला.

यानंतर एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार आणि त्यांच्या पथकाने या घटनेचा सीसीटीव्ही व मोबाईलद्वारे या दोघांचा तपास चालू करण्यात आला.

त्यानंतर हे दोघंही आरोपी सुट्टीच्या दिवशी डोंबिवली, नवी मुंबई, मिरा रोड, नालासोपारा या ठिकाणी चोरी करून उत्तर प्रदेशला जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

त्यानंतर त्यांचा ठावठिकाणा समजताच त्यांना कळवा येथील जय भीमनगरमध्ये ते असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर त्यांच्या शोधासाठी पोलीस हवालदार शिंदे, पोलीस हवालदार खोत, पोलीस नाईक देवकर, पोलीस शिपाई मोरे, पोलीस शिपाई सवळी तसेच पोलीस शिपाई हरमाळे यांनी आरोपी थांबलेल्या ठिकाणी छापा टाकून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणात धीरेंद्रकुमार रामदेव पाल,(वय 22) तर अभिषेक रामअजोर यादव (वय 22,दोघेही आरोपी प्रतापगड,उत्तर प्रदेश) येथील असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून उघडकीस आलेले गुन्ह्यामध्ये नालासोपारा येथे एकूण 6 बँकेचे एटीएम फोडले, तर 23 रोजी चेंबूर येथे 5 बँकांचे एटीएम,05 रोजी एमएचबी, दहिसर येथील 5 बँकांचे एटीएम व 3 रोजी डोंबिवली येथील 5 बँकांचे एटीएम फोडले होते. अशा प्रकारे त्यांनी एकूण 21 एटीएम फोडल्याचे सांगण्यात आले आहे.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.