दिल्लीतून पत्नीने हलवली सूत्र, मुंबईत पतीची सुपारी देऊन घडवली हत्या

Crime News | मयत रमेश झा हा नोकरी निमित्त अंबरनाथ शहरात राहत होता. त्याची पत्नी सुमन झा ही आपल्या मुलांसह दिल्ली येथे राहत होती. २५ फेब्रुवारी रोजी रमेश झा याचा मृतदेह अंबरनाथ - बदलापूर रोडवरील पेट्रोलपंप जवळ मिळून आला.

दिल्लीतून पत्नीने हलवली सूत्र, मुंबईत पतीची सुपारी देऊन घडवली हत्या
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 6:57 AM

अंबरनाथ, उल्हासनगर | दि. 1 मार्च 2024 : मुंबईजवळ असलेल्या कल्याणमधील बदलापूर रोडवर झालेल्या एका इसमाच्या हत्येचा गुन्हा उघडकीस आणण्यात उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. कोणताही धागादोरा नसताना देखील पोलिसांनी दिल्लीमध्ये निजामुद्दीन रेल्वे स्थानकात सापळा रचून थरारक पाठलाग करत चार आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे सदर हत्या घडवून आणण्यासाठी एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने तीन जणांना तब्बल ३० लाखांची सुपारी दिली असल्याचे उघडकीस आले आहे.

पोलिसांनी सुरु केला तपास

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रमेश झा हा नोकरी निमित्त अंबरनाथ शहरात राहत होता. त्याची पत्नी सुमन झा ही आपल्या मुलांसह दिल्ली येथे राहत होती. २५ फेब्रुवारी रोजी रमेश झा याचा मृतदेह अंबरनाथ – बदलापूर रोडवरील पेट्रोलपंप जवळ मिळून आला. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेचा समांतर तपास उल्हासनगर गुन्हे अन्वेशन विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली देखील सुरु करण्यात आला होता.

सापळा रचून ओरपी अटकेत

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ४८ तासांच्या आत या हत्येचा उलघडा करण्यात यश मिळवले आहे. रमेश झा यांची हत्या करून आरोपी दिल्ली येथे पळून जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सोनावणे, राजेंद्र थोरवे, गणेश गावडे, चंद्रकांत पाटील या पथकाने दिल्ली येथील निजामुद्दीन रेल्वे स्थानकात फिल्मी स्टाईल सापळा रचून थरारक पाठलाग करत चार आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

प्रियकराच्या मदतीने काढला काटा

अटक केलेल्या आरोपीमध्ये सुमन झा, दीपक कुमार, संजय कुमार आणि संतोष गुप्ता यांचा समावेश आहे. आरोपी सुमन झा या महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पती रमेश याच्या हत्येसाठी तब्बल ३० लाखांची सुपारी दिली असल्याचे उघडकिस आले आहे. या घटनेत एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा देखील शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.