Mumbai Avighna Tower Fire Live | मुंबईतल्या अविघ्न इमारतीतील आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश

| Updated on: Oct 23, 2021 | 12:08 AM

Mumbai Currey Road Avighna Tower Fire News update: करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आगीची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Mumbai Avighna Tower Fire Live | मुंबईतल्या अविघ्न इमारतीतील आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश
अविघ्न टॉवरमध्ये आग

मुंबई : मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आगीची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जीव वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका रहिवाश्याचा दुर्दैवाने या घटनेत मृत्यू झाला आहे.

करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारतीमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. 19 व्या मजल्यावर आग लागल्यानंतर दुरुन आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत होता. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 19 व्या मजल्यावर फर्निचरचं काम सुरु होतं. त्यावेळी आग लागल्याची माहिती समोर येत आहे. पण यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Oct 2021 04:17 PM (IST)

    उंच इमारतीमध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ, प्रशासन निश्चित धोरण तयार करणार : किशोरी पेडणेकर

    मुंबई : उंच इमारतीच्या आगीच्या संदर्भात घटना वाढत आहेत. यावर महापालिका प्रशासन निश्चित धोरण तयार करणार आहे. उंच इमारती होतात तेव्हा फायर सेफ्टी महत्त्वाची आहे. स्प्रिंग आणि हायड्रोलिक वॉटर सिस्टीम तिथं कार्यरत होती हे प्रत्यक्षात जाणवलं आहे.इमारतीच्या आगीच्या दुर्घटनेची चौकशी तर होणारच आणि कारवाई ही होणार, असे महापोर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

  • 22 Oct 2021 04:04 PM (IST)

    आग का लागली याचा तपास केला जाईल, अशा वेळी इतरांना वाचवणं गरजेचं : आदित्य ठाकरे

    अशा ठिकाणी आम्ही थोडे मागे राहतो. पण थोडं समजून घेणं गरजेचं आहे. या घटना घडणं चुकीचं आहे. कधीकधी फायरब्रिगेड, पोलीस, वॉचमॅन थोडं कठोरपणे वागतात. आग लागल्यानंतर इतरांना वाचवणं गरजेचं आहे. फायर रिफ्यूजर आणि फायर हायड्रिंग सिस्टिम हे आग विझविण्यासाठी तसेच मोठी आग लागून नये यासाठी महत्त्वाचे आहेत.

  • 22 Oct 2021 02:20 PM (IST)

    अविघ्न इमारतीतील आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश

    मुंबईतल्या अविघ्न इमारतीतील आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश

    सुमारे दोन ते अडीच तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात

    आगीत एकाचा मृत्यू, सुदैवाने दुसरी कोणतीही जीवितहानी नाही

    नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन व्यवस्थितपणे

  • 22 Oct 2021 02:18 PM (IST)

    काही तरी जळाल्यासारखा वास आला, बघितलं तर अग्नितांडव सुरु होतं, प्रत्यक्षदर्शीने थरारक अनुभव सांगितला

    आग लागली तेव्हा आम्ही घरात होतो. पण धुराचे लोट पसरल्याने काही तरी जळाल्यासारखा वास आला. ही दुर्गंधी अधिकच वाढल्याने आम्ही खिडकी आणि दरवाजा उघडून पाहिल्यानंतर आमच्याच सोसायटीला आग लागल्याचे दिसले. धुराच्या लोटाने परिसर काळवंडून गेला होता. हे दृश्य पाहून काळजात धस्स झालं अन् आम्ही आहे त्या अवस्थेत घरातून तात्काळ बाहेर धाव घेतली… करीरोडच्या अविघ्न पार्क सोसायटीत राहणाऱ्या व्यक्तीने आँखो देखी सांगितली.

  • 22 Oct 2021 01:33 PM (IST)

    मुंबई महापालिका आायुक्त इकबाल सिंह चहल काय म्हणाले?

    अविघ्न इमारतीच्या 19 व्या आणि 20 व्या मजल्यावर आग जास्त पसरली काहीच मिनिटांमध्ये महापालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले आग विझवण्यावर आणि लोकांच्या रेस्क्यूवर जास्तीत जास्त भर दिला याप्रकरणी जो कुणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करु अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणारच, कुणालाही अभय नाही आगीची संपूर्ण चौकशी केली जाईल, चौकशीनंतर दोषींवर कारवाई करु

  • 22 Oct 2021 01:21 PM (IST)

    अविघ्नमध्ये अग्नितांडव, खबरदारी म्हणून मोनोसेवा तूर्तास बंद

    अविघ्नला लागलेल्या आगीमुळे मोनोसेवा बंद करण्यात आलेली आहे. कारण इमारतीला लागूनच मोनोसेवेचा ट्रॅक आहे. खबरदारी म्हणून मोनोसेवा तूर्तास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आहे.

    avighna park Fire photo

    avighna park Fire photo

  • 22 Oct 2021 01:15 PM (IST)

    अविघ्नचं मॅनेजमेंट दोषी, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे : महापौर पेडणेकर

    अग्निशमन दलाचे लोक शिडी लावून चढेपर्यंत अरुण तिवारीचा हात खाली निसटला आणि तो खाली पडला. बहुतेक 19 व्या मजल्यावर फर्निचरचं काम सुरु होतं. यातून आग लागल्याची माहिती आहे. सोसायटीतले लोक सांगतायत त्यांची वॉटर सिस्टम चालू नव्हती. दरवेळी महापालिका काय करेल, सगळ्या सिस्टम आहेत. पण सिस्टम वर्किगमध्ये ठेवलं नाही. इमारतीचे जे कोणी मॅनेजमेंट आहेत, ते प्रथमदर्शनी दोषी दिसतायत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं महापौर पेडणेकर म्हणाल्या.

  • 22 Oct 2021 01:05 PM (IST)

    Avighna Building Fire : जीव वाचवताना हात सुटून अविघ्नमधील रहिवाशाचा मृत्यू

    करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आग लागली. आगीनंतर इमारतीतून जीव वाचवण्याचा प्रयत्न करणारा एक रहिवासी बाहेर लटकत होता. मात्र यावेळी तो उंचावरुन खाली पडल्याने त्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. अरुण तिवारी असं त्याचं नाव आहे.

  • 22 Oct 2021 12:59 PM (IST)

    19 व्या मजल्यावर आग, 20 व्या मजल्यावर राहणाऱ्या महिलेने काय सांगितलं?

    अविघ्न पार्कमधील 19 मजल्यावर आग आगली. मी रहायला 20 व्या मजल्यावर आहे. मला जसंही आगीचे लोट दिसले, तसंही मी लगोलग खाली उतरले. इतरांनाही आगीची माहिती दिली. आगीची भीषणता खूपच होती. माझ्या माहितीप्रमाणे 19 व्या मजल्यावर कुठेतरी फर्निकरचं काम सुरु होती. त्यावेळी आग लागली. परंतु बिल्डिंगमध्ये ऑटोमॅटिक फायर सिस्टम आहे. रहिवासी इमारत असल्याने नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परंतु रेस्क्यू ऑपरेशन जवळपास पूर्ण झालेलं हे. नागरिक अडकल्याची भीती राहिलेली नाही.

  • 22 Oct 2021 12:45 PM (IST)

    मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल

    भीषण आग लागली आहे. सध्या महापालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले आहेत. रेस्क्यू ऑपरेशन सुरु झालं आहे. मात्र इतकी मोठी इमारत असूनही आगीनंतरची काही यंत्रणा तिथे उपलब्ध होती, असं चित्र दिसलं नाही. मी आता घटनास्थळी आहे. अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत.

    आग हळूहळू अनेक मजल्यांवर पसरतीय. 19 ते 25 मजल्यांवरती सध्या आग आहे. परंतु वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आग जोरात पसरतीय. लोकांना बाहेर काढण्यासंबंधी तत्काळ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अधिकारी काम करत आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

  • 22 Oct 2021 12:39 PM (IST)

    अविघ्न बिल्डिंमधील 19 व्या मजल्यावर आग, इमारतीतील नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरु

    अविघ्न बिल्डिंमधील 19 व्या मजल्यावर आग इमारतीतील नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरु महापालिकेडून रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात अग्निशमन अधिकारी घटनास्थळी दाखल अनेक जण इमारतीत अडकल्याची माहिती

  • 22 Oct 2021 12:36 PM (IST)

    Exclusive : अविघ्न टॉवरमधील आगीचा भीषण व्हिडीओ

Published On - Oct 22,2021 12:19 PM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.