VIDEO: फडणवीसांना एक नव्हे सहावेळा नोटीसा, जबाब नोंदवणं यात काही गैर नाही: दिलीप वळसेपाटील

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एक नव्हे तर सहावेळा नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. फडणवीस यांना आरोपी म्हणून नोटीस पाठवली नाही. नोटीस म्हणजे समन्स नाही. फडणवीसांकडे काही माहिती आहे. ती माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस गेले आहेत.

VIDEO: फडणवीसांना एक नव्हे सहावेळा नोटीसा, जबाब नोंदवणं यात काही गैर नाही: दिलीप वळसेपाटील
फडणवीसांना एक नव्हे सहावेळा नोटीसा, जबाब नोंदवणं यात काही गैर नाही: दिलीप वळसेपाटीलImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 2:30 PM

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक नव्हे तर सहावेळा नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी दिली. फडणवीस यांना आरोपी म्हणून नोटीस पाठवली नाही. नोटीस म्हणजे समन्स नाही. फडणवीसांकडे काही माहिती आहे. ती माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस गेले आहेत. तसेच एसआयटीच्या (SIT) कार्यालयातून काही गोपनीय पत्रं आणि तांत्रिक माहिती बाहेर गेली आहे. त्यामुळे त्याची माहिती घेण्यासाठी त्यांचा जबाब नोंदवला जात आहे, असं दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात एकूण 24 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आली आहे. फडणवीसांची साक्ष बाकी होती. त्यांना काही प्रश्नावली पाठवली होती. त्यांच्याकडून प्रश्नावलीची उत्तरे आली नाही. म्हणून पोलिसांनी त्यांच्या घरी त्यांचा जबाब घेण्याचा निर्णय घेतला. त्यात गैर काही नाही, असंही त्यांनी सांगितलं. दिलीप वळसे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली.

या प्रकरणाची वस्तुस्थिती समजून घ्या. हा गुन्हा सायबर पोलीस ठाणे मुंबई येथे 26 मार्च 2012 रोजी नोंद झाला आहे. नमूद तारखेवेळीअज्ञात इसमाने राज्य गुप्ता वार्ता गोपनीय पत्रं आणि माहिती बेकायदेशीर प्राप्त केली. ही राज्य गुप्तवार्ता विभागाची गोपनीय माहिती बाहेर गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. टेलिग्राफ अॅक्ट, माहिती तंत्रज्ञान कायदा, ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट अन्वये पाच अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला. 24 साक्षीदारांचे जवाब नोंदवले गेले आहे. ज्यांचा ज्यांचा संबध त्यांचे जबाब घेणं बंधनकारक आहे, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

प्रश्नावलींची उत्तरे दिली नाहीत म्हणून

फडणवीस यांना 21 ऑगस्ट 2021 पहिली नोटीस दिली. दुसरी नोटीस 6 सप्टेंबर 2021 रोजी, तिसरी 8 ऑक्टोबर 2021ला दिली, चौथी नोटीस 17 नोव्हेंबर 2021ला दिली होती. त्यानंतर एक नोटिस 23 मार्चा 2022 आणि 11 मार्च 2022ला दिली होती. एकूण पाच ते सहा वेळा नोटिस दिली. नोटीस याचा अर्थ समन्स नाही. फडणवीस यांनी पेन ड्राईव्हबाबत काही माहिती सभागृहात दिली होती. एसआयटीमधून ही माहिती बाहेर कशी गेली? याची माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस फडणवीसांकडे गेले आहेत. फडणवीसांचं मत आणि भूमिका काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. शेवटी काय माहिती द्यायची, काय नाही द्यायची हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना पूर्वीही नोटीस पाठवली. त्यावेळी त्यांना पोलीस स्टेशनला बोलावलं नव्हतं. केवळ प्रश्नावली पाठवली होती. 2 मार्च 2022 लाही त्यांना प्रश्नावली पाठवली होती. परंतु त्यांच्याकडून प्रश्नावलीची उत्तरे आली नाही. म्हणून पोलिसांनी त्यांच्या घरी त्यांचा जबाब घेण्याचा निर्णय घेतला. त्यात गैर काही नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

बाहेर पडला की पाऊस अन् टिव्ही लावला की राऊत, हसन मुश्रीफांची जोरदार फटकेबाजी

मुख्यमंत्री पदावरून प्रमोद सावंत, विश्वजीत राणेंमध्ये शीतयुद्ध; जाहिरातीतून सावंतांचा फोटो गायब

Maharashtra News Live Update : गोवा भाजपतील मतभेद चव्हाट्यावर येण्याची मालिका थांबेना !

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...