Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांना दिलासा, आता कस्तुरबा रुग्णालयात ‘डेल्टा प्लस’ चाचणी होणार, अवघ्या दोन दिवसात मिळणार रिपोर्ट

यामुळे पुण्याला चाचणीसाठी सॅम्पल पाठवल्यानंतर रिपोर्टसाठी लागणारे तब्बल दोन महिन्यांचे ‘वेटिंग’ आता संपणार आहे. (Mumbai Delta Plus Test Will be held At Kasturba Hospital report)

मुंबईकरांना दिलासा, आता कस्तुरबा रुग्णालयात ‘डेल्टा प्लस’ चाचणी होणार, अवघ्या दोन दिवसात मिळणार रिपोर्ट
मुंबईत्या त्या 7 जणांची ओमिक्रॉन चाचणी नेगेटीव्ह
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 3:08 PM

मुंबई : महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आता कस्तुरबा रूग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग मशीन बसवणार आहे. यामुळे आता कोरोनाचे नवनवीन व्हेरियंट तपासणीसाठी आता नमुने पुण्याच्या एनआयव्हीला पाठवण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Mumbai Delta Plus Test Will be held At Kasturba Hospital report will be available in just two days)

दोन महिन्यांचे ‘वेटिंग’ आता संपणार

राज्यातील कोरोनाचे स्वरुप दिवसेंदिवस बदलत आहे. मुंबई महापालिकेने कस्तुरबा रुग्णालयात डेल्टा प्लस चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी येत्या दोन आठवड्यात कस्तुरबा रुग्णालयात अमेरिकेहून साडेसहा कोटींचे अत्याधुनिक मशीन आणले जाणार आहे. या ठिकाणी केवळ दोन ते चार दिवसांत डेल्टा चाचणी अहवाल मिळणार आहे. यामुळे पुण्याला चाचणीसाठी सॅम्पल पाठवल्यानंतर रिपोर्टसाठी लागणारे तब्बल दोन महिन्यांचे ‘वेटिंग’ आता संपणार आहे.

महापालिकेकडून वेगवेगळ्या चाचण्या करण्यासाठी यंत्रणा

मुंबई महापालिकेला ‘डेल्टा प्लस’ संशयित सुमारे 600 अहवालांचे रिपोर्ट मिळाले आहेत. मुंबईत ‘डेल्टा प्लस’चा केवळ एकच रुग्ण आढळला असून तो बरादेखील झाला आहे. मात्र मुंबई महापालिका आगामी काळात अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषाणूंची चाचण्या करण्यासाठी यंत्रणा उभारत आहे. सद्यस्थितीत पालिका ‘डेल्टा प्लस’सारख्या वेगळ्या विषाणूंच्या ‘जिनोम सिक्वेन्स’साठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी’कडे संशयित रुग्णांची सॅम्पल पाठवली जातात. मात्र या चाचण्यांचे अहवाल येण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागतो.

कस्तुरबा रुग्णालयात चाचण्या

मात्र सद्यस्थितीत डोके वर काढणारा ‘डेल्टा प्लस’ सर्वाधिक वेगाने पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने ‘डेल्टा प्लस’सारख्या विषाणूंच्या चाचण्या कस्तुरबा रुग्णालयात करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

(Mumbai Delta Plus Test Will be held At Kasturba Hospital report will be available in just two days)

संबंधित बातम्या  

मुंबईकरांसाठी गूड न्यूज, 50 टक्के लहान मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज

पश्चिम रेल्वे मार्गावर 15 डब्यांच्या 25 लोकल ट्रेन प्रवाशांच्या सेवेत रुजू

मुंबईत धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला, केवळ 16 टक्के पाणीसाठा शिल्लक

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.