‘ड्रग्स प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवलं जातंय, माझ्याविरोधात कारवाई नको’, समीर वानखेडेंचं पोलिस महासंचालकांना पत्र

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी पोलिस महासंचालक संजय पांडे आणि मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना एक पत्र लिहिल्याची माहिती मिळतेय. ड्रग्स प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवलं जातं आहे, असा आरोप वानखेडे यांनी या पत्रात केलाय.

'ड्रग्स प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवलं जातंय, माझ्याविरोधात कारवाई नको', समीर वानखेडेंचं पोलिस महासंचालकांना पत्र
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 8:31 PM

मुंबई : मुंबई क्रुझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणावरुन राज्यात जोरदार राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्वीट करुन खळबळ उडवून दिलीय. एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी एनसीबीची पोलखोल केलीय. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे त्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी संजय राऊत यांनी केलीय. या पार्श्वभूमीवर आता एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी पोलिस महासंचालक संजय पांडे आणि मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना एक पत्र लिहिल्याची माहिती मिळतेय. ड्रग्स प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवलं जातं आहे, असा आरोप वानखेडे यांनी या पत्रात केलाय. त्याचबरोबर माझ्यावर कोणतीही कारवाई केली जाऊ नये, अशी मागणीही वानखेडे यांनी केली आहे. (Mumbai Drugs case Sameer Wankhede’s letter to DGP Sanjay Pandey)

समीर वानखेडेंची नेमकी मागणी काय?

मुंबई ड्रग्स प्रकरणात चुकीच्या पद्धतीनं अडकवलं जात आहे. माझ्याविरोधात कोणतीही कारवाई केली जाऊ नये. आर्यन खान प्रकरण माझ्या वरिष्ठांकडे आहे, असं पत्र समीर वानखेडे यांनी पोलिस महासंचालकांना लिहिल्यांची माहिती मिळत आहे. संजय राऊत यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओनंतर उठलेल्या राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर वानखेडे यांनी पोलिस महासंचालकांना हे पत्र लिहिल्याचं कळतंय.

संजय राऊतांचे ट्वीट आणि वानखेडेंवर गंभीर आरोप

दरम्यान, संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ड्रग्स प्रकरणात एनसीबीवर जोरदार हल्ला चढवलाय. दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याची दखल घेतली पाहिजे. फक्त एखादा गोळीबार झाला की न्यायालयीन चौकशी करावी असं नाही. हे प्रकरण सुद्धा तितकंच गंभीर आहे. एनसीबी सारख्या केंद्रीय यंत्रणा या कुणाच्या दबावाखाली मुंबईत काम करतात. राज्याला बदनाम करतात, हे देशाला कळलं पाहिजे, असं राऊत म्हणाले. मलिक यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ती चौकशी झाली पाहिजे. कोणतीही चौकशी करा, पण या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशीच केली पाहिजे. महाराष्ट्र सरकारने या संदर्भात स्यूमोटो कारवाई करायलाच हवी, असंही ते म्हणाले.

प्रभाकर साईलच्या व्हिडीओनंतर एनसीबीचं प्रसिद्धीपत्रक

एनसीबीचे अधिकारी मुठा अशोक जैन यांनी हे प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये त्यांनी एनसीबीची भूमिका मांडली आहे. “आर्यन खान ड्रग्ज प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणावर सध्या न्यायालयात खटला सुरु आहे. तसेच या प्रकरणातील पंच असलेल्या प्रभाकर साईल यांना काही मत मांडायचं होतं तर त्यांनी सोशल मीडिया ऐवजी न्यायालयात मांडायला हवं होतं. त्यांनी सोशल मीडियावर काही लोकांची नावे घेत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांना एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी खंडण केलं आहे. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी आणि तपासणी करण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांचं प्रतिज्ञापत्र एनसीबीच्या डायरेक्टरांकडे पाठवत असून त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल”, असं एनीसीबीच्या प्रसिद्धीपत्रात म्हटलं आहे.

इतर बातम्या :

एनसीबीला खोटे ठरविण्यासाठी आता व्हिडीओ क्लिपचा आधार, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा आरोप

‘सोशल मीडियात बोलू नका, कोर्टात जा’, एनसीबीने प्रभाकर साईल यांचे आरोप फेटाळले

Mumbai Drugs case Sameer Wankhede’s letter to DGP Sanjay Pandey

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.