Mumbai Fire : मुंबईतील भायखळा येथील झकेरिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग, फायर ब्रिगेड घटनास्थळी
मुंबई: मुंबईतील भायखळा परिसरातील झकेरिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आग लागलीय. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मुंबईतील भायखळा भागात ही घटना घडलीय.
मुंबई: मुंबईतील (Mumbai Fire) भायखळा (Bhayculla)परिसरातील झकेरिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आग लागलीय. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मुंबईतील भायखळा भागात ही घटना घडलीय. ही आग मोठी असल्याचं येत असलेल्या दृश्यांमधून दिसून येत आहे. गेल्या एक तासांपासून ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) आठ गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. हा रहिवाशी परिसर असल्यानं नेमकं किती नुकसान झालंय यासंबंधी माहिती मिळालेली नाही. आगीचं कारण देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आगीत जीवितहानी झालीय की नाही याबाबत आतापर्यंतची माहिती समोर आलेली नाही, असं कळतंय.
मुंबईत आग सत्र सुरुच
मुंबईतील आग लागण्याच्या घटना सुरुच आहेत. आज दुपारी 1 वाजताच्या दरम्यान भायखळा परिसरातील झकेरिया इंडस्ट्रियल इस्टेट या परिसरात ही आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहे आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असं कळतंय.
आगीचं कारण अस्पष्ट
भायखळा परिसरातील झकेरिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आग लागल्यानं धुरांचे लोट परिसरात दिसून येत होते. झकेरिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
आगीत नुकसान किती?
मुंबईतील भायखळा परिसरात आज दुपारी लागलेल्या आगीमुळं नेमकं किती नुकसान झालं. हे अद्याप समोर आलं नाही. आगीच्या घटनेत जीवितहानी झाली आहे की नाही हे देखील अद्याप समोर आलेलं नाही.
मुंबईत आगीच्या वाढत्या घटना
मुंबईत काही दिवसांपूर्वी अविघ्न या इमारतीमध्ये आग लागली होती. त्यानंतर देखील मुंबईत आगीच्या घटना घडल्या होत्या. मुंबई महापालिका प्रशासन आगीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी काय प्रयत्न करते हे पाहावं लागणार आहे.
भायखळा परिसरात जानेवारी महिन्यात देखील आग
मुंबईतील भायखळा परिसरात जानेवारी महिन्यात आग लागली होती. भायखळा येथील मुस्तफा बझार येथे लाकडाच्या गोडाऊनला आग लागली होती. आज देखील भायखळा परिसरातील इकेरिया इंडस्ट्रिलय इस्टेटला आग लागली आहे. येथील आगीत नेमकं किती नुकसान झालं हे पाहावं लागेल. या संदर्भातील अधिक माहिती समोर आलेली नाही.
इतर बातम्या:
निवडणूक आयोगाने राजकीय आरक्षणाची माहिती दिली नाही; छगन भुजबळांचा आरोप