Mumbai hoarding collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला, बचाव कार्याची स्थिती काय? VIDEO
Ghatkopar hoarding collapse : घाटकोपर छेडा नगरमध्ये सोमवारी संध्याकाळी एका पेट्रोल पंपाच्या छतावर होर्डिंग कोसळलं. या भीषण दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. काल मुंबईत अवकाळी पाऊस कोसळत असताना ही दुर्देवी घटना घडली. कुणाच्या ध्यानी मनी नसता हे संकट कोसळलं. महत्त्वाच म्हणजे हे होर्डिंग अनधिकृत होतं.
घाटकोपरच्या छेडा नगर परिसरात सोमवारी संध्याकाळी भीषण दुर्घटना घडली. वादळी वाऱ्यासह कोसळणारा मुसळधार अवकाळी पाऊस मुंबईवर संकट घेऊन आला. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास मुंबईत जोरदार वारा सुटलेला असताना, छेडा नगरमध्ये जाहीरातीच एक मोठं लोखंडी होर्डिंग शेजारच्या पेट्रोल पंपाच्या छतावर कोसळलं. सगळा पेट्रोल पंप या होर्डिंगखाली दबला गेला. दुर्घटनेच्यावेळी पट्रोल-डिझेल भरण्यासाठी आलेल्या वाहनांसह जवळपास 100 जण या पेट्रोल पंपावर होते. त्यावरुन पेट्रोल पंप किती मोठा होता? याची कल्पना येते. सोसाट्याचा वारा सुटलेला, त्यात पाऊस सुरु झालेला, त्यामुळे लोक पेट्रोल पंपाच्या आडोशाला उभे होते, त्याचवेळी ही ह्दयद्रावक घटना घडली. या दुर्देवी घटनेत अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, NDRF ची बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाली.
घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळण्याच्या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. 74 जण जखमी आहेत. एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. 31 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आलं आहे. जखमींना जवळच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपयांची मदत केली जाईल.
#WATCH | Mumbai: Ghatkopar hoarding collapse incident | Latest visuals of the rescue operations from the spot.
The death toll in the Ghatkopar hoarding collapse incident has risen to 14 pic.twitter.com/Rr0Qee6dHI
— ANI (@ANI) May 14, 2024
कोणाविरुद्ध कुठल्या कलमाखाली गुन्हा?
मुंबई पोलिसांनी या प्रकरणात इगो मीडियाचे मालक आणि अन्य व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मालक भावेश भिडेसह अन्य व्यक्तींविरोधात कलम 304, 338, 337, 34 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला असून प्रकरणाची चौकशी सुरु आहे. पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनुसार हे होर्डिंग अनधिकृत होतं, त्यासाठी कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. पेट्रोल पंप असल्यामुळे होर्डिंग गॅस कटरने कापणं शक्य नव्हतं. कारण त्यामुळे आग लागण्याचा धोका होता. घटनास्थळी लगेच मोठ मोठ्या क्रेन्स मागवण्यात आल्या. त्यांच्या माध्यमातून लोखंडी आणि स्टीलचे रॉड हटवण्यात आले.
मृतांची नाव –
भरत राठोड, चंद्रमनी, दिनेश कुमार जैस्वाल, मोहम्मद आक्रम, बशीर, दिलीप शामसुंदर पासवान, परवेश जाधव, सतीश सिंग, फहीम खान, सूरज चव्हाण, धनेश,