Mumbai hoarding collapse : होर्डिंग दुर्घटनेत लोकांचा जीव गेला, त्या दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेत्यांमध्ये भांडण, Video
Mumbai hoarding collapse : घाटकोपरमध्ये काल संध्याकाळी होर्डिंग दुर्घटना घडली. भलंमोठ होर्डिंग पेट्रोल पंपाच्या छतावर कोसळून अनेक नागरिकांनी आपले प्राण गमावले. त्याच दुर्घटनास्थळी भाजपा आणि महाविकास आघाडीचे नेते आपसात भांडत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. यात ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवणारे दोन्ही उमेदवार तिथे होते.
घाटकोपरच्या छेडा नगर परिसरात सोमवारी संध्याकाळी एक भीषण दुर्घटना घडली. एका पेट्रोल पंपाच्या छतावर भलंमोठं होर्डिंग कोसळलं. लोखंडी आणि स्टीलचे रॉड असलेल्या या होर्डिंगखाली अख्खा पेट्रोल पंप दबला गेला. पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी आलेल्या वाहनांसह जवळपास 100 लोक या पेट्रोल पंपाखाली दबले गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. होर्डिंग खाली अडकलेल्या 74 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. काही जखमींवर जवळच्या राजावडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पहिल्याच बेमोसमी पावसाने मुंबईमध्ये मोठ नुकसान झालं. एक मोठी दुर्घटना घडली. निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले.
घाटकोपर येथे दुर्घटनास्थळी फायर ब्रिगेड आणि NDRF चे जवान अजूनही बचाव कार्यात गुंतले आहेत. प्रशासन आपल्यापरीने जीव वाचण्याचे सर्व प्रयत्न करतय. त्याचवेळी होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा आणि महाविकास आघाडीचे नेते आपसात भांडत असल्याच चित्र दिसलं. भाजपा नेते किरीट सोम्मय्या, मिहिर कोटेचा आणि पराग शहा घटनास्थळी होते. त्याचवेळी महाविकास आघाडीचे संजय दीना पाटील सुद्धा तिथे होते. त्यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. संजय दीना पाटील आणि मिहिर कोटेचा उत्तर-पूर्व लोकसभा म्हणजे ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवत आहेत. ‘कॅमेरा घेऊन किरीट सोमय्या आतमध्ये शायनिंग मारण्यासाठी गेला होता का?’
मविआ नेते संजय दीना पाटील यांनी किरीट सोमय्यांवर आक्षेप घेतला. किरीट सोमय्या घटनास्थळी आत गेल्याने संजय दीना पाटील भडकले. “भाजपा नेते बचाव कार्यात अडथळे आणत आहेत. सोमय्यांमुळे बचाव कार्य काही काळ थांबवून ठेवलं होतं” असा आरोप संजय दीना पाटील यांनी केला. “खोट बोलतायत, ते उल्लू बनवत आहेत. खोटं बोलण यांचं काम आहे. ते का आत गेले? प्रशासनाच्या कामात अडथळे आणतात” असा आरोप संजय दीना पाटील यांनी केला. ‘कॅमेरा घेऊन किरीट सोमय्या आतमध्ये शायनिंग मारण्यासाठी गेले होते का?’ असा सवाल संजय दीना पाटील यांनी विचारला.