मुंबईत वादळी वाऱ्यामुळे सोमवारी हाहा:कार उडला. घाटकोपर येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपाच्या बाजूला बेकायदेशीर लावण्यात आलेले होर्डिंग कोसळले. वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. या ठिकाणी होर्डिंग असलेला कंपनीचा मालक भावेश भिडे आपल्या संपूर्ण परिवाला घेऊन फरार झाला आहे. त्याच्या विरोधात पंत नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत भावेश भिडे याचा फोटो व्हायरल झाला आहे.
14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे.. श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात..
हे सुद्धा वाचामनाला चीड आणणारे हे चित्र..
त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते
हे या चित्रावरून स्पष्ट होते..
टक्केवारी साठी कोविड काळातले खिचडी चोर.. कफनचोर..
आजही टक्केवारी साठी 14… pic.twitter.com/5OGtWxh2Pp
— Ram Kadam ( modi ka parivar ) (@ramkadam) May 14, 2024
भाजप आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे आणि इंगो मीडिया कंपनीचे मालक भावेश भिडे याचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यात म्हटले आहे की, 14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे.. श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात.. मनाला चीड आणणारे हे चित्र.. त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते… हे या चित्रावरून स्पष्ट होते.. टक्केवारीसाठी कोविड काळातले खिचडी चोर.. कफनचोर.. आजही टक्केवारीसाठी 14 लोकांचे नाहक बळी घेता आहेत.. कुठे फेडणार हे पाप..? असे राम कदम यांनी म्हटले आहे.
होर्डिंग प्रकरणाचा तपास उच्चस्तरीय एसआयटी स्थापन करुन त्यांच्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. ते म्हणाले, या होर्डिंगला 1 जानेवारी 2020 ते 1 मार्च 2022 पर्यंत परवानगी आहे. शहाजी निकम यांनी ही परवानगी दिली. 40 फुटांची परवानगी असताना 120 फुटांची परवानगी दिली आहे. याबाबत पोलिसांकडे हरकती नोदवल्या पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता भावेश हा आपल्या परिवारासोबत पळून गेला आहे. त्याला पोलिसांनी फरार घोषित करावे
30 जानेवारी 2020 ला पेट्रोल पंप आरक्षण करण्यात आले. या ठिकाणी पेट्रोलपंप उभारण्याची परवानगी दिली. उद्धव ठाकरे सरकारने हा पेट्रोल पंप बेनामी कंपनीला चालवण्यासाठी दिला. या पेट्रोल पंपच्या आसपासची झाडे मारण्यात आली आणि तोडण्यात आली. मुंबई पालिकेचा भ्रष्टाचार खूप वाढला आहे. अनेक वेळा तक्रारी करून दुर्लक्ष झाले आहे. रेल्वेतील जीआरपी ही त्या त्या राज्य सरकारची पोलीस यंत्रणा असते. राज्याचे पोलिस महासंचालक यांच्या नेतृत्वा खाली हे काम करतात. या होर्डिंगसाठी 16 लाख 97,440 भाडे मिळत होते. त्यापैकी काही भाडे हे पोलीस कल्याण निधीला जात होते, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली आहे. अनेक व्यापारी भेटण्यास येत असतात, त्यात उद्धव ठाकरे यांचा दोष काय? अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. भुजबळांच्या या प्रतिक्रियेवर आश्चर्य व्यक्त होत आहे.