खेळताना दोराचा लागला फास; 7 वर्षाच्या मुलीचा झाला मृत्यू, परिसरात एकच हळहळ

Mumbai Gowandi : लपाछपीचा खेळ खेळत असताना आनंदाचे क्षण अचानक दु:खात बदलले. गोवंडीतील शिवाजीनगरमध्ये एका 7 वर्षाच्या मुलीच्या गळ्याला फास लागला. इतर खेळणाऱ्या मुलांच्या लक्षात ही बाब येईपर्यंत तिचा मृत्यू झाला.

खेळताना दोराचा लागला फास; 7 वर्षाच्या मुलीचा झाला मृत्यू, परिसरात एकच हळहळ
खेळताना लागला गळफास, मुलीचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 30, 2024 | 9:37 AM

मुंबईतील गोवंडी येथील शिवाजीनगरमध्ये एक हृदय पिळवटणारी घटना समोर आली आहे. भावडांसोबत खेळत असताना एका 7 वर्षांच्या मुलीला दोरीचा फास लागला. भावडांना ही बाब लक्षात येईपर्यंत उशीर झाला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी घरात धाव घेतली. तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. घटनेवेळी कोणीही वडीलधारी मंडळी घरात नव्हती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. थोड्यावेळापूर्वी आपल्याशी दंगा करणारी बहिण गेल्याने भावडांना मोठा धक्का बसला.

काळाने साधला डाव

रविवार असल्याने मुलांचा दंगा सुरु होता. घरातील वडीलधारी मंडळी बाहेर असल्याने इतर मुलांसोबत त्यांची मस्ती सुरु होती. बैंगवाडी येथे रविवारी दुपारी बाराच्या सुमारास आकृती सिंह ही तिची भावंडे आणि शेजारील एका मुलीबरोबर लपाछपी खेळत होती. लपाछपीचा डाव रंगला होता. त्याचवेळी खेळताना दोरीचा फास लागून तिचा मृत्यू झाला. ही घटना गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात घडली. याबाबत शिवाजी नगर पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरू केला आहे.

हे सुद्धा वाचा

अंदाज हुकला आणि गळफास लगाला

घरातील इतर सदस्य बाहेर गेले होते. त्यामुळे घरात ही चार मुले होती. त्यांचा लपाछपीचा डाव सुरु होता. घरात वेगवेगळ्या भागात ही भावंडे लपली होती. तर मुलगी पोटमाळ्यावर लपली होती. हा खेळ सुरु असतानाच पोटमाळ्यावरून खाली उतरण्यासाठी लावण्यात आलेल्या शिडीच्या दोरीचा फास मुलीच्या गळ्यात अडकला. मुलीचा पोटमाळ्यावरुन उतरताना दोरीचा अंदाज आला नाही. उतरण्याच्या गडबडीत फास तिच्या गळ्यात अडकण्याची शक्यता आहे.

ही बाब लक्षात येताच या मुलीच्या मोठ्या बहिणीने तत्काळ घराबाहेर धाव घेत शेजाऱ्यांना घटना सांगितली. शेजाऱ्यांनी घरात धाव घेतली. तिला खाली घेत परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. शिवाजी नगर पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे मुलीच्या भावडांना मोठा धक्का बसला.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.