Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नाही; पालिकेचा न्यायालयात दावा

Mumbai Coronavirus situation | शहरातील 42 लाख सामान्य नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर 82 लाख नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. सध्याचा केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात सुरु असल्याने लसीकरण मोहीम पूर्ण वेगात सुरु आहे.

मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नाही; पालिकेचा न्यायालयात दावा
मुंबईतील शहरी बेघरांसंदर्भात धोरण बनविण्यासाठी होणार सर्व्हेक्षण
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 2:15 PM

मुंबई: राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका उरलेला नाही, असा दावा मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे. महानगरपालिकेने उच्च न्यायालयात तशी माहिती दिली. मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या 2586 नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर 3942 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

याशिवाय, शहरातील 42 लाख सामान्य नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर 82 लाख नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. सध्याचा केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात सुरु असल्याने लसीकरण मोहीम पूर्ण वेगात सुरु आहे. त्यामुळे एकंदर परिस्थिती पाहता मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नाही, असे पालिकेने न्यायालयात सांगितले.

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घसरण

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 2 हजारांनी घट झाली. कालच्या दिवसात देशात 18 हजार 346 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 263 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या अडीच लाखांच्या घरात आहे. कालच्या दिवसातील नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा हा गेल्या 209 दिवसातील निचांकी ठरली आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 18 हजार 346 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 263 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 29 हजार 639 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 38 लाख 53 हजार 48 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 31 लाख 50 हजार 886 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 49 हजार 260 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 2 लाख 52 हजार 902 इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 91 कोटी 54 लाख 65 हजार 826 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 18,346

देशात 24 तासात डिस्चार्ज – 29,639

देशात 24 तासात मृत्यू – 263

एकूण रूग्ण – 3,38,53,048

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 2,52,902

एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) – 3,31,50,886

एकूण मृत्यू  – 4,49,260

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 91,54,65,826

संबंधित बातम्या:

टीका झाली तरी चालेल, पण खोटा धीर देणार नाही : मुख्यमंत्री

मोठी बातमी: महागाईमुळे मुंबईकरांचं बजेट कोलमडणार; सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ

रावण दहन करा, पण प्रेक्षकांना बोलवू नका; नवरात्रौत्सवासाठी गृहविभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.