Rain | नालासोपाऱ्यात सकाळपासून मुसळधार पाऊस, पूर्व सेंट्रल पार्क, आचोळा, अल्कापुरी, स्टेशन परिसरात पाणीच पाणी

नालासोपाऱ्यात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असल्याने पाणी पातळीत वाढ होतयं. रस्त्याच्याकडेला पार्किंग केलेल्या वाहनात ही पाणी शिरलं आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन बंद पडत आहेत. आज मोहरमनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे शाळा कॉलेजला सुट्टी आहेत.

Rain | नालासोपाऱ्यात सकाळपासून मुसळधार पाऊस, पूर्व सेंट्रल पार्क, आचोळा, अल्कापुरी, स्टेशन परिसरात पाणीच पाणी
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 9:43 AM

मुंबई : वसई विरार (Vasai Virar) नालासोपाऱ्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. यामुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडणे देखील शक्यत होत नाहीयं. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) शहरातील सखल भागामध्ये पाणी भरले. रस्त्यावर गुडघाभर पाण्यातील धोकादायक पध्दतीने प्रवास करावा लागतोयं. नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क, आचोळा, अल्कापुरी, स्टेशन (Station) परिसर याठिकाणी पाणीच पाणी झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे रस्तेही गायब झाल्याचे चित्र आहे. पाण्यामुळे स्टेशन परिसरात जाणे देखील शक्य होत नाहीयं.

नालासोपाऱ्यात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू

नालासोपाऱ्यात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असल्याने पाणी पातळीत वाढ होतयं. रस्त्याच्याकडेला पार्किंग केलेल्या वाहनात ही पाणी शिरलं आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन बंद पडत आहेत. आज मोहरमनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे शाळा कॉलेजला सुट्टी आहेत. रस्त्यावर पाणी साचल्याने काही रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षा बंद ठेवल्या आहेत. दिवसभर पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास नागरिकांची चिंता वाढू शकते.

हे सुद्धा वाचा

पूर्व सेंट्रल पार्क, आचोळा, अल्कापुरी, स्टेशन परिसर याठिकाणी पाणीच पाणी

काल रात्रीपासूनच मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आल्याने अनेक नद्यांना पूर आलायं. नाशिक जिल्हात तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्हामध्ये पुराच्या पाण्यात तब्बल 6 जण वाहून गेले आहेत. तसेच पुढील 24 तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वसई विरार नालासोपाऱ्यात सातत्याने पाण्याच्या पातळीत वाढ होताना दिसत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.