Mumbai Rain, Local Train Updates LIVE : जरांगे यांची शरद पवार गटाबाबत भूमिका काय ? – प्रवीण दरेकर
Mumbai Rains and Local Train News LIVE Updates in Marathi : मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. तर सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतूकही ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Mumbai Rain Live Update : मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे मुंबईतील दादर, हिंदमाता, सायन, अंधेरी, मालाड यांसह अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईत काल रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. कर्जत, कसारा या ठिकाणाहून मुंबईकडे येणारी लोकल ठाण्यापर्यंत सुरु आहे. यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
रंजन कुमार शर्मा पुण्याचे नवे पोलीस सह आयुक्त
रंजन कुमार शर्मा पुण्याचे नवे पोलीस सह आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. प्रवीण पवार यांच्या आयुक्तपदी वर्णी नंतर रंजन कुमार शर्मा पुणे शहराचे नवे सह आयुक्त.
-
भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्याने हौदोस घातला
भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्याने हौदोस घातला आहे. भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने 25 ते 30 जणांना चावा घेतला. कुत्रा चावल्यामुळे दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. लहान मुलांसह वयोवृद्धांना देखील कुत्र्याने चावा घेतला. भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात अनेक जण उपचारासाठी दाखल झाले आहेत. गेल्या तीन दिवसात कुत्र्याने शंभरहून अधिक लोकांना चावा घेतला.
-
-
उपराष्ट्रपती जगदीप धनखड ११ जुलैला मुंबई दौऱ्यावर
उपराष्ट्रपती जगदीप धनखड ११ जुलैला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. उपराष्ट्रपती धनखड विधीमंडळात सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. विधीमंडळाच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. विधानसभा सभागृहात विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांसोबत उपराष्ट्रपती संवाद साधणार आहेत. उपराष्ट्रपती “लोकशाही बळकटीकरण” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
-
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाचा मोठा दिलासा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची निवडणूक आयोगासमोर आज झाली सुनावणी. यावेळी निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला अधिकृत मान्यता दिली. कलम 29 ब नुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता देणगी स्वीकारता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शरद पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
-
नांदेडमध्ये आरक्षण रॅलीतून सामाजिक सलोख्याचा संदेश
नांदेड शहरातील आलीभाई टावर येथे मनोज जरांगे पाटील यांची आरक्षण रॅली आल्यानंतर मुस्लिम भगिनीकडून फुलांची उधळण करण्यात आली. जरांगे पाटील यांनी मुस्लिम भगिनींना हात दाखवून अभिवादन केले. नांदेडमध्ये या आरक्षण रॅलीतून सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला.
-
-
कल्याणमध्ये जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला
कल्याण पश्चिम जोशीबाग परिसरातील एका जुन्या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. इमारतीचा भाग समोरील एका चाळीवर कोसळल्याने घरातील दोन महिला जखमी झाल्या आहेत. अग्निशमन पथक, केडीएमसी पथक आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल आहे. इमारतीतील सहा घरांसह आसपासच्या चाळीमधील राहिवाशांना घरे रिकामे करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
-
मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीत काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांनी घेतला सहभाग
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले. उपोषण केले. पण, सरकारने त्याची दखल घेतली नाही. नांदेड येथील दोन ते तीन लाख लोक सहभागी झाले आहेत. लोकसभा खासदार या नात्याने सरकारकडे पत्र दिले. त्याची प्रत जरांगे पाटलांना दिली. या मोर्चानंतर आरक्षण झाले नाही तर त्यांच्या पुढे काम करू असे काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांनी म्हटले.
-
बायकोला विचारायचो मी खरच खासदार झालो का? बजरंग सोनावणे यांचा मिश्कील टोला
केज विधानसभा मतदार संघातील आमदार आपलाच होईल. अधिकाऱ्यांनी ज्यांच्याकडे जे विभाग आहे, तेच काम करावे. मी खासदार झालोच हे त्याचे खरे दुखणे आहे. काही जण समजून घेतच नाही. मलाही एक महिना मी खासदार झाल्याचे समजले नाही. मी सतत बायकोला विचारायचो की मी खरच खासदार झालो का? असा मिश्कील टोला खासदार बजरंग सोनावणे यांनी लगावला.
-
जरांगे यांची शरद पवार गटाबाबत भूमिका काय ? – प्रवीण दरेकर
मनोज जरांगे यांनी राष्ट्रवादीच्या शरद गटाबाबत त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे त्यांनी जाहीर करावे अशी मागणी भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. मनोज जरांगे महायुतीच्या विरोधात आणि मविआला साजेशी भूमिका घेत आहे असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.
-
पश्चिम विदर्भाला ‘यलो अलर्ट’ जारी
पुढील 24 तासात पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती,यवतमाळसाठी प्रादेशिक हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. बुलढाणा, अमरावतीत, मुसळधार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. नागपूरच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
-
खासदार बजरंग सोनावणे यांचे आरोग्य उपसंचालकांनी केले कौतूक
राज्याचे आरोग्य उपसंचालक डॉ.अशोक थोरात यांनी खासदार बजरंग सोनावणे यांच्या केजमधील नागरी सत्कार समारंभात सहभाग घेत त्यांचे कौतूक केल्याने वाद निर्माण झाला आहे. थोरात यांनी ‘व्हीआरएस’ मागितली आहे. तसा त्यांनी राजीनामा अर्ज देखील केला आहे. मात्र त्यांचा VRS अद्याप मंजूर नाही. आज खासदार बजरंग सोनावणे यांचा केज मध्ये नागरी सत्कार आयोजित होता. या सत्कार समारंभात त्यांनी सहभाग घेतला. बजरंग सोनावणे यांचे भाषणात कौतुक केले आहे. थोरात माजलगाव विधानसभा मतदार संघातून शरद पवार यांच्या गटाकडून इच्छुक आहेत.
-
पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट तूर्तास टळले
पुणे शहराला पाणी पुरविणाऱ्या खडकवासला प्रकल्पात 6 दिवसात 2 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. खडकवासला, पानशेत, टेमघर, आणि वरसगाव या चारही धरणातील पाणीसाठा कमी होऊन ३.५० टीएमसी झाला होता.
-
कोल्हापूर, साताऱ्याला रेड अलर्ट; ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा
कालपासून मुंबईसह राज्यात पावसाने जोर धरला आहे. कोल्हापूर आणि साताऱ्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढील २,३ दिवस कोकणातील घाट भागात ऑरेंज अलर्ट राहील, असं हवामान खात्याने म्हटलं आहे.
-
कर्जत आणि कसारासाठी विशेष लोकल सुरू
रेल्वे प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत आणि कसारासाठी विशेष लोकल सुरू झाली आहे. सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भांडुप स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅक वर पाणी साचल्याने रेल्वे सेवा ठप्प होती. मध्य रेल्वेच्या काही स्टेशनवर एकामागे एक अशा रेल्वे ट्रेन एक्सप्रेस गाडी उभ्या रांगेत होत्या. विशेष लोकल सुरू करत खोळंबलेलं रेल्वे वेळापत्रक पुन्हा सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न सुरु कररण्यात येत आहे. तर विशेष लोकल सोडत असल्याचीमाहिती मिळताच पुन्हा स्टेशन परिसरात गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. त्याचा आढावा घेतला. सर्व यंत्रणा एकत्र येत काम करत आहेत. लोकांना आवाहन आहे की गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. प्रशासनाला सहकार्य करा, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
-
मुंबईकरांना महत्वाचं आवाहन…
मुंबईकरांना महत्वाचं आवाहन… गरज नसेल तर आज घराबाहेर जाणं टाळा… धो- धो पाऊस कोसळतोय. त्यातच मुंबईत आज मोठी भरती येणार आहे. 1. 57 मिनिटांनी मोठी भरती मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर आदळणार आहे. त्यामुळे बीचवर जाणं टाळा.
-
मुख्यमंत्री शिंदेंकडून राज्यातील पावसाचा आढावा
मुख्यमंत्री शिंदेंकडून राज्यातील पावसाचा आढावा घेतला जातोय. यावेळी मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित आहेत. राज्यात ठिकठिकाणी दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. याचा मुख्यमंत्री आढावा घेत आहेत.
-
मुख्यमंत्री शिंदे मंत्रालयाच्या कंट्रोल रूममध्ये
रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईची तुंबई झालीय. अशात यंत्रणा अलर्टमोडवर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयाच्या कंट्रोल रूममध्ये पोहोचले आहेत. इथे जात त्यांनी मुंबईसह राज्यातील पावसाचा आढावा घेतला.
-
मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज नांदेडमध्ये
रॅलीत येणाऱ्या लोकांसाठी भाजी भाकरीची सोय. अर्धापूर तालुक्यातील प्रत्येक घरातून जमा केली भाजी भाकरी
-
चुनाभट्टी रेल्वे रुळावरील पाणी पंप्पाच्या साह्याने बाहेर काढण्यास सुरुवात
रेल्वेचे अधिकारी देखील याठिकाणी उपस्थित आहेत. युद्धपातळीवर पाणी काढण्याचे काम सुरू आहे.
-
मुंबईचा पहिला तलाव भरला
मुंबईचा पवई तलाव भरला आहे, चांगला पाऊस झाल्याने तलाव भरून वाहत आहे.
-
मुंबईची लोकलसेवा विस्कळीत
वडाळा ते मानखुर्द लोकलसेवा बंद झालीये. पाणी साचल्याने लोकल बंद
-
विमानसेवा विलंबाने सुरू
मुंबई ते नागपूर विमानसेवा विलंबाने सुरू आहे, मुंबईच्या पावसाचा मोठा फटका बसलाय.
-
Maharashtra News : मुसळधार पावसामुळे लोकलवर मोठा परिणाम
मुसळधार पावसामुळे लोकलवर मोठा परिणाम. हार्बर मार्गावरील अनेक लोकल उशिराने धावत आहेत. पनवेल रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशी खोळंबले. मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी.
-
Maharashtra News : रायगड-अलिबाग मुरुड मार्गावरील छोट्या पुलाचा काही भाग खचला
मुरुड तालुक्यातील चिकणी येथील पुल खचला. कालच्या अतिवृष्टीने पूल खचल्याने बनला धोकादायक. बॅरीकेडींग करून खचलेल्या बाजूकडून वाहतूक बंद. या मार्गावर आता एकेरी वाहतूक सुरू.
-
Maharashtra News : फुकटाचे निर्णय हिताचे नसतात – शरद पवार
“शेती पाणी योजनेला मोफत वीज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता फुकट वीज झाल्यावर मोटर बंद करायला कोण जाणार?. त्यामुळे पाणी जाऊन जाऊन त्यांच्या बाप जादयांची जमीन क्षारपड होईल. त्यांचे भवितव्य उद्धवस्त करायचे नसेल, तर फुकटाचे निर्णय हिताचे नसतात. त्याचा गैरवापर होत असतो, त्याच त्याचा गैरवापर न करणं याची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी” असं शरद पवार म्हणाले.
-
Maharashtra News : किल्ले रायगडावर जाणाऱ्या वाटा बंद
किल्ले रायगडावर जाणाऱ्या वाटा बंद. जिल्हा प्रशासन व पोलिसांनी घेतला निर्णय. गडावर चालत जाणार्या मार्गावर लावण्यात आले बॅरीकेडस. पोलिसांचा 24 तास राहणार बंदोबस्त. पावसाळ्यात धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे घेतला निर्णय. गडावरील रोप वे ची सेवा ही राहणार बंद. कालच्या प्रकारानंतर प्रशासनाकडून सावध पवित्रा.
-
Marathi News: शरद पवार आज सांगली दौऱ्यावर
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार आज सांगली दौऱ्यावर आहे. कवठेएकंद येथे शरद पवार यांचे आगमन झाले आहे. याठिकाणी शरद पवार हे क्षारपड जमीन बाबत शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
-
Marathi News: राजापूर पुरात अडकलेल्या 56 नागरिकांना राजापूर पोलिसांनी वाचवले
रत्नागिरीतील राजापूर पुरात अडकलेल्या 56 नागरिकांना राजापूर पोलिसांनी वाचवले. पाच तास सुरू होतो रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. राजापूर बाजारपेठेत पुराच्या पाण्यात नागरीक अडकले होते. बोटीच्या सहाय्याने अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले. रविवारी राजापूर बाजारपेठेत पाच ते सहा फुटांपर्यंत पुराचं पाणी होते.
-
Marathi News: अकलूजचे धरणाचे 4 दरवाजे उघडले
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पूर्णा नदीच्या खोऱ्यात गेल्या १२ तासांत सरासरी ७०.४ मिमी पाऊस झाला. यामुळे गेल्या तीन दिवसांपूर्वी बंद करण्यात आलेला विसर्ग पुन्हा सुरु करण्यात आला. आज अकलूजचे धरणाचे 4 दरवाजे 1 मीटरने उघडून धरणातून 7628 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात विसर्ग करण्यात आला.
-
Marathi News: चिपळूणमध्ये नदीच्या पाण्याच्या पातळीत घट
चिपळूणमधील वाशिष्टी नदीच्या पाणीपातळीत घट झाली आहे. आज सकाळपासून पावसाची उघडीप दिल्यामुळे पाणी कमी होत आहे. मात्र हवामान खात्याकडून आजही ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
-
Marathi News: पावसामुळे लोकल रेल्वे स्थानकावर थांबून
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद लोकल ही गेली पाऊण तासापासून घाटकोपर आणि विद्याविहारमध्ये थांबली आहे. यामुळे या ट्रेनमधील प्रवासी आता ट्रेनमधून उतरून रेल्वे रुळातून प्रवास करत आहेत.
-
Mumbai Rains Update : मुंबईतल्या मुसळधार पावसाचा आमदारांना फटका, अनेक आमदार ट्रेनमध्ये अडकले
मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका अधिवेशनात जाणाऱ्या सात आमदारांनाही बसला आहे. कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांचाही समावेश. रेल्वे ट्रॅकवर पाणी भरल्यामुळे कुर्ला येथे हावडा मेल मागच्या दीड तासापासून अडकलेली आहे.
आ. संजय गायकवाड , आ. अमोल मिटकरी, आ. जोगेंद्र कवाडे, अनिल पाटील आणि इतर सात आमदार हावडा मेलमध्ये अडकले आहेत.
-
Mumbai Rains Update : मुंबईत 300 मिमी पावसाची नोंद, वडाळा- जीटीबी स्टेशनदरम्यान रुळांवर साचलं पाणी
मुंबईत रविवारी रात्रीपासून मुसळधार झालेल्या पावसाचा फटका मुंबईच्या लाईफलाइनला देखील बसला. मुंबईतील हार्बर लाईनची सेवा ठप्प झाली. मुंबईत रविवारी रात्री 1 ते सोमवारी सकाळपर्यंत 7 वाजेपर्यंत 300 मिमी पावसाची नोंद झाली.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Waterlogged railway tracks between Wadala and GTB stations.
Mumbai has recorded over 300 mm of rainfall from 1 am to 7 am today. More rain is expected during the day as well. pic.twitter.com/B9zzZs1bY4
— ANI (@ANI) July 8, 2024
-
Mumbai Rains Update : मालाड भुयारी मार्गाची अवस्था अत्यंत वाईट, पाण्यात एका बाजूला कार तर दुसरीकडे मोठा टेम्पो अडकला
मालाड भुयारी मार्गाची अवस्था अत्यंत वाईट झाली असून पाण्यात एका बाजूला कार अडकली आहे तर दुसऱ्या बाजूला मोठा टेम्पो अडकला आहे. क्रेन मशीनच्या सहाय्याने पाण्यात बुडलेली कार बाहेर काढली जात आहे. सध्या पाऊस थांबला असून, भुयारी मार्गातील पाणी हळूहळू कमी होत आहे. भुयारी मार्गात अडकलेला टेम्पो टोइंग व्हॅनद्वारे बाहेर काढण्याचे काम वाहतूक पोलिस करत आहेत. तर मालाड सबवेमध्ये अडकलेल्या कारची क्रेनच्या मदतीने सुटका करण्यात येत आहे.
-
Mumbai Rain Live Update : कोल्हापूरहून मुंबईला जाणारी एक्स्प्रेस अंबरनाथमध्ये अडीच तासापासून रखडली
कोल्हापूरहून मुंबईला जाणारी एक्स्प्रेस अंबरनाथमध्ये अडीच तासापासून रखडली. मुंबईत रेल्वेसेवा बंद असल्यानं अंबरनाथच्या सायडिंगलाच एक्स्प्रेस उभी असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
एक्सप्रेस मधून उतरून रिक्षा आणि मिळत्या वाहनाने, प्रवासी आपल्या घराच्या दिशेने रवाना झाले आहेत.
-
Mumbai Rain Live Update : मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाच्या CDOE (दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या) परीक्षा पुढे ढकलल्या
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे मुंबई विद्यापीठाच्या CDOE च्या (दूरस्थ आणि ऑनलाईन ) आज पहिल्या सत्रातील ( ११ ते २ या वेळेतील) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 13 जुलै रोजी ही परीक्षा त्याच वेळी होणार असल्याचे विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
Maharashtra | Due to the heavy rains, all the exams of CDOE (formerly IDOL) scheduled on 8th July in the first half from 11:00 AM to 2:00 PM, have been postponed. The new date for these exams will be 13th July: University of Mumbai pic.twitter.com/zhGIiIhRPY
— ANI (@ANI) July 8, 2024
-
Mumbai Rain Live Update : कल्याण बस डेपोत प्रवाशांची मोठी गर्दी
कल्याण बस डेपोत प्रवाशांची मोठी गर्दी. पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळित होताच लांब पल्ल्याच्या प्रवाशांकडून पर्यायी सेवेचा शोध सुरू. बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेनंतर बसचा पर्याय निवडण्याचा प्रयत्न केला मात्र इथेही त्यांच्या पदरी काहीशी निराशाच पडत असल्याने प्रवासी संतापले आहेत.
-
Mumbai Rain Live Update : सांताक्रुझ येथे अनेक परिसरात साचले ३ ते ४ फ़ूट पाणी, घरात पाणी शिरल्याने नागरिक बेहाल
मुंबईच्या सांताक्रुझ गोळीबार चौथा रस्ता, आनंद सोसायटी आणि परिसर, राजे शिवाजी बालवाडी, अजून पण ३ ते ४ फ़ूट पाणी साचले आहे. घरात पाणी शिरल्याने नागरिक बेहाल झाले असून मनपाकडे मदतीसाठी नागरिकांनी साकडं घातलं आहे. मात्र अद्याप कोणतीच मदत मिळाली नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
-
Mumbai Rain Live Update : सायन सर्कल येथे रात्री पडलेल्या पावसाने पाणी साचलं
सायन सर्कल येथे रात्री पडलेल्या पावसाने पाणी साचलं. वाहनांना साचलेल्या पाण्यातून जिकीरीने मार्ग काढावा लागतोय.
-
Mumbai Rain Live Update : मुंबईतील रेल्वे रुळांवर पाणी साचले, लोकल वाहतूक विस्कळीत
Mumbai Rain Live Update : मुंबईतील रेल्वे रुळांवर पाणी साचले, लोकल वाहतूक विस्कळीत
#WATCH | Mumbai, Maharashtra: Waterlogged railway tracks between Wadala and GTB stations.
Mumbai has recorded over 300 mm of rainfall from 1 am to 7 am today. More rain is expected during the day as well. pic.twitter.com/B9zzZs1bY4
— ANI (@ANI) July 8, 2024
-
Mumbai Rain Live Update : मुंबई शहरात 110 मिमी पावसाची नोंद
Mumbai Rain Live Update : मुंबई शहरात 110 मिमी पावसाची नोंद
⛈️ काल (७ जुलै २०२४) सकाळी ८ वाजता ते आज (८ जुलै २०२४) सकाळी ६ वाजता या २२ तासांच्या कालावधीत मुंबईतील पावसाची नोंद पुढीलप्रमाणे आहे.
➡️ शहर- ११०.१० मिलिमीटर
➡️ पूर्व उपनगरे- १५०.५३ मिलिमीटर
➡️ पश्चिम उपनगरे- १४६.३५ मिलिमीटर
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 8, 2024
-
Mumbai Rain Live Update : मुंबईत ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद
Mumbai Rain Live Update : मुंबईत ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद
🌧️मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही सखाल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे.
🏫आज देखील जोरदार…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 8, 2024
-
Mumbai Rain Live Update : पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या ‘या’ एक्सप्रेस रद्द
Mumbai Rain Live Update : पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या ‘या’ एक्सप्रेस रद्द
#ALERT FOLLOWING TRAINS ARE CANCELLED.@Central_Railway @YatriRailways pic.twitter.com/WWEkzLo7Dm
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) July 8, 2024
-
Mumbai Rain Live Update : मुंबईतील मुसळधार पावसाचा विमानसेवाही उशिराने
Mumbai Rain Live Update : मुंबईतील मुसळधार पावसाचा विमानसेवाही उशिराने
मुसळधार पावसाचा फटका मुंबई विमानतळालाही
मुंबईतून जाणाऱ्या व येणाऱ्या विमाने उशिराने सुरु असल्याने प्रवाशी त्रस्त
-
Mumbai Rain Live Update : अंधेरीतील अनेक घरात घुसले पाणी
Mumbai Rain Live Update : अंधेरीतील अनेक घरात घुसले पाणी
मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक सखल भागात पाणी देखील साचल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील आंबोली सिजर रोड परिसरातील झोपडपट्टीतील अनेक घरात पाणी घुसल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे झोपेत असलेल्या नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाल्याच दिसून आले. जोरदार पावसामुळे झोपडपट्टीतील गटारे वाहू लागले, याच गटाराचे पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरातील सामान देखील पाण्यामुळे भिजून गेले आहे, यामुळे नागरिकांना मोठ्या नुकसानीचा सामना देखील करावा लागत आहे.
-
Mumbai Rain Live Update : कोल्हापूरहून मुंबईला येणारी महालक्ष्मी एक्सप्रेस दीड तासांपासून उभी
Mumbai Rain Live Update : कोल्हापूरहून मुंबईला येणारी महालक्ष्मी एक्सप्रेस दीड तासांपासून उभी
कोल्हापूरहून मुंबईला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस अंबरनाथमध्ये अडकली
मुंबईत रेल्वेसेवा बंद असल्यानं अंबरनाथच्या सायडिंगला एक्सप्रेस उभी
सकाळपासून एक्सप्रेस उभी असल्यानं प्रवाशांचा खोळंबा
एक्सप्रेसमध्ये प्रवासांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय
प्रवाशांचे मोठे हाल
-
Mumbai Rain Live Update : मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज
Mumbai Rain Live Update : मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज
हवामान खात्याने मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले आहे
-
Mumbai Rain Live Update : मुंबईत गेल्या सहा तासात 300 मिमी पाऊस
Mumbai Rain Live Update : मुंबईत गेल्या सहा तासात 300 मिमी पाऊस
मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
काही सखाल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे.
-
Mumbai Rain Live Update : मुंबईतील सर्व महापालिका, शासकीय आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर
Mumbai Rain Live Update : मुंबईतील सर्व महापालिका, शासकीय आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर
मुंबई शहरासह उपनगरातील सर्व महापालिका, शासकीय आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर
त्यासोबतच महाविद्यालयांनीही सुट्टी जाहीर
सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी,
परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येईल, मुंबई महापालिकेची माहिती
-
Mumbai Rain Live Update : पुणे-मुंबई रेल्वेसेवा विस्कळीत, एक्सप्रेस गाड्या रद्द
Mumbai Rain Live Update : पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या दोन रेल्वे गाड्या रद्द
डेक्कन क्वीन आणि सिंहगड एक्सप्रेस या दोन्ही गाड्या रद्द
मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे प्रशासनाचा निर्णय
-
Mumbai Rain Live Update : मुंबईच्या सखल भागात पाणी, रस्ते वाहतूक ठप्प
Mumbai Rain Live Update : मुंबईत काल रात्रीपासूनच पावसाने धुमाकूळ घातला आहे
पावसाच्या जबरदस्त बॅटिंगमुळे सखल भागात पाणीच पाणी
सायन, कुर्ला, माटुंगा, चांदिवली परिसरातील सकल भागामध्ये पाणी साचले
-
Mumbai Rain Live Update : डोंबिवली शहरात दमदार पाऊस
Mumbai Rain Live Update : डोंबिवली शहरात दमदार पावसाला सुरुवात
मुसळधार पावसाचा फटका रेल्वे लोकलला
सकाळच्या सुमारास मध्ये रेल्वेची रेल्वे सेवा विस्कळीत
चाकरमानी वर्गांचे मोठे हाल
मध्यरात्रीपासून डोंबिवली शहरात रिमझिम पाऊस
-
Mumbai Rain Live Update : भांडुप स्टेशनदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी, अप-डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प
Mumbai Rain Live Update : भांडुप स्टेशनदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी, अप-डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प
भांडुप स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅक वर पाणी साचल्याने मध्य रेल्वे विस्कळीत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान अप अँड डाऊन मार्गावरील सर्वच ट्रेन पूर्णपणे ठप्प
ठाण्याच्या पुढे लोकल ट्रेन व एक्सप्रेस गाड्या जात नसल्याने कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांची आणि चाकरमान्यांची मोठी गर्दी
-
Mumbai Rain Live Update : अंधेरी सब-वे पाण्याखाली, पंपिंग मशिनद्वारे पाणी काढण्याचे काम सुरु
Mumbai Rain Live Update : मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पावसामुळे अंधेरी भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी अंधेरी भुयारी मार्ग दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स लावून बंद केला आहे.
दोन्ही बाजूला बीएमसी आणि पोलीस कर्मचारी तैनात आहेत, पंपिंग मशिनद्वारे पाणी काढण्याचे काम सुरू आहे.
भुयारी मार्गाच्या आजूबाजूचे रस्तेही पाण्याने भरले आहेत. भुयारी मार्गाच्या आजूबाजूला पूरस्थिती पाहायला मिळत आहे.
या मार्गावरून जाणाऱ्या गाड्यांना गोखले पुलाकडे जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा अंधेरी सबवे तुडुंब भरतो आणि तो बंद होतो.
सध्या पाऊस थांबून भुयारी मार्गातील पाणी ओसरेपर्यंत हा भुयारी मार्ग बंद राहणार आहे.
-
Mumbai Rain Live Update : डोंबिवली स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी
Mumbai Rain Live Update : मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी सेवा फक्त ठाण्यापर्यंतच सुरू!
डोंबिवली स्थानकात प्रवास यांची मोठी गर्दी
अनेक चाकरमानी वर्ग घरचा रस्ता गाठत आहे
तर मुंबईहून कर्जत आणि कसारा कडे जाणाऱ्या विशेष लोकल सुरू
मुसळधार पावसाचा फटका मध्ये रेल्वेला
-
Mumbai Rain Live Update : मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी
Mumbai Rain Live Update : मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी सेवा फक्त ठाण्यापर्यंतच सुरु
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे ठाण्याच्या पुढे रुळांवर पाणी साचल्याची माहिती
कर्जत, कसाऱ्याकडून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा फक्त ठाण्यापर्यंतच सुरू
-
Mumbai Rain Live Update : मुंबई उपनगरात पाणीच पाणी, अनेक गाड्या अडकल्या
काल रात्रीपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरु आहे.
मुंबई उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे.
मालाड मिठ चौकी लिंक रोड, गोरेगांव लिंक रोडवर पाणी तुंबले आहे. यामुळे अने गाड्या पाण्यात अडकून पडल्या आहेत.
बांगूर नगर लिंक रोडवर मोठे झाड पडल्याने लिंक रोड बंद करण्यात आला आहे.
Published On - Jul 08,2024 8:02 AM