बॅड लक! MPSC च्या 1143 जागांमधून मजल मारली, 111 जणांनी नियुक्ती मिळवली, पण कोर्टाकडून अचानक नियुक्ती स्थगित, कारण…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवारी दिलेल्या 111 जणांच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे.

बॅड लक! MPSC च्या 1143 जागांमधून मजल मारली, 111 जणांनी नियुक्ती मिळवली, पण कोर्टाकडून अचानक नियुक्ती स्थगित, कारण...
जलेबी बाबाला 14 वर्षांची शिक्षाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 7:51 PM

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवारी दिलेल्या 111 जणांच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे. विशेष म्हणजे आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार होतं. पण 111 उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यास स्थिगिती देण्यात आलीय .

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 1143 जागा भरण्यात आल्या होत्या. सर्व नियुक्त उमेदवारांना आज रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे एमपीएससीतर्फे नियुक्ती पत्र दिलं जाणार होतं.पण आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे यामधील 111 उमेदवारांना नियुक्तीपत्र देता येणार नाही.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयात या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याच्या विरोधात तातडीची याचिका दाखल करण्यात आली होती.संबंधित याचिका दाखल करणाऱ्या तीन EWS उमेदवारांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

ज्या 111 उममेदवारांना नियुक्ती पत्र देण्यास स्थगिती देण्यात आलीय त्यांनी सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र त्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यात येणार होतं. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठापुढे आज संध्याकाळी झालेल्या तातडीच्या सुनावणी दरम्यान याबाबत निकाल देण्यात आला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 1143 जागा भरण्यात आलेल्यांपैकी 111 नियुक्त्यांवर हायकोर्टाने स्थगिती दिलीय. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यावर हायकोर्टाच्या स्थगितीमुळे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देता येणार नाही.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.