मद्यप्रेमींसाठी खुशखबर, मतमोजणीच्या दिवशी मुंबईत 4 जूनला दारुविक्रीला हायकोर्टाची परवानगी
राज्यासह देशभरात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जूनला समोर येणार आहे. या दिवशी मुंबईत निवडणुकीती मतमोजणी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ड्राय डे घोषित केला होता. पण याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी हायकोर्टाने बार मालकांना मोठा दिलासा दिला आहे.
मुंबई हायकोर्टाने बार मालकांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबईत 4 जूनला दारु विक्रिला परवानगी देण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशीचा ड्राय डे रद्द करण्याच्या याचिकेवर कोर्टात सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर या प्रकरणी निकालही देण्यात आला आहे. आहार संघटनेकडून याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी पार पडून निकालही देण्यात आला आहे. हा निकाल बार मालकांच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे बार मालकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. याशिवाय मद्यप्रेमींनादेखील या निकालामुळे आनंद होणार आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं आहे. आता 4 जूनला मतमोजणीला केली जाणार आहे. या दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे. या दिवशी मुंबईत जिल्हाधिकाऱ्यांकडून ड्राय डे घोषित करण्यात आला होता. पण याबाबत बार मालकांनी आक्षेप घेतला होता. याप्रकरणी आहार संघटनेने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. अखेर मुंबई हायकोर्टाने याबाबत मोठा निर्णय दिला आहे. मतमोजणीच्या दिवशी निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबईत दारु विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.
याचिकेत नेमका दावा काय होता?
लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होताच मुंबईत दारूविक्री खुली करण्यात आली आहे. न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने बार मालकांना मतमोजणीच्या दिवशी दारुविक्रीची मुभा दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच मुंबईत दारूविक्री खुली होणार आहे.
आहार संघटनेने’ड्राय डे’ रद्द करण्याची मागणी याचिकेत केली होती. याबाबत मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. पण मुंबई जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला आहार संघटनेने हायकोर्टात आव्हान दिलं होतं. जिल्हाधिकारींच्या आदेशामुळे बेकायदेशीर दारू विक्री होण्याची शक्यता याचिकेत वर्तवण्यात आली होती. कोर्टाने दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर बारमालकांना मोठा दिलासा दिला.