AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. (Mumbai High Court On Local Permission for Common people) 

सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 9:01 AM

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने सरकारकडून लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात. तसेच सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. (Mumbai High Court On Local Permission for Common people)

राज्यातील लॉकडाऊन शिथील करण्यात येत आहे. मॉल्स, हॉटेल्स सुरु करण्यात आले आहे. सरकारी कार्यालयातही कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपस्थितीत अनिर्वाय करण्यात आली आहे. तसेच खासगी कार्यालयांमधील कर्मचारी कामावर येऊ लागले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता आता मुंबईतील लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

त्याशिवाय सर्वसामान्य लोकांनाही लोकल प्रवासाची परवानगी दिली जावी, अशी सूचना मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठाने दिली.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच वकिलांनाही लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या वतीने करण्यात आली होती. अॅड मिलिंद साठे आणि अॅड उदय वारुंजीकर यांनी याबाबत हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना हायकोर्टाने हे निर्देश दिले.

राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु असल्याने दैनंदिन व्यवहार सुरु झाले आहे. मात्र अपुर्‍या रेल्वे सेवेमुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या सोयीसाठी लोकलच्या फेऱ्या वाढवणं गरजेचे आहे. तेव्हा मध्य रेल्वेवर 600 तर पश्चिम रेल्वेवर 700 लोकल फेऱ्या केल्या जाव्या, या दृष्टीने राज्य सरकारने विचार करावा, असे हायकोर्टाने म्हटले. (Mumbai High Court On Local Permission for Common people)

संबंधित बातम्या : 

UGC कडून देशातील 24 बनावट विद्यापीठांची यादी जाहीर, उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्रातील विद्यापीठाचाही समावेश

पोलीस दलात 33 टक्के महिला पोलिसांची भरती करा, शिवसेना महिला आमदाराची गृहमंत्र्यांकडे मागणी

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.