मुंबईतील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील शिंदे गटातील बड्या नेत्याच्या मुलाची बारमध्ये पार्टी… त्यानंतर काय घडले?

mumbai viral hit and run: मुंबई पोलिसांच्या तीन गाड्या याठिकाणी पोहोचल्या आहेत. सुमारे अर्धा तासापेक्षा जास्त वेळ पोलिसांचे पथक घटनास्थळी आहे. पार्टीत किती लोक सहभागी झाले होते आणि त्यांनी मद्यपान केले होते का, याचीही माहिती घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. पोलीस बारमधील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत.

मुंबईतील 'हिट अँड रन' प्रकरणातील शिंदे गटातील बड्या नेत्याच्या मुलाची बारमध्ये पार्टी... त्यानंतर काय घडले?
Mumbai hit-and-run case
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 3:11 PM

पुणे येथील बड्या बिल्डरच्या मुलाचे ‘हिट अँड रन’चे प्रकरण समोर आले होते. त्या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील आणि पुण्यातील कोट्यधीश व्यक्ती विशाल अग्रवाल याला अटक झाली होती. त्यानंतर अल्पवयीन मुलाची आई आणि अजोबा यांनाही अटक झाली. आता त्यानंतर मुंबईतील वरळीमधील ‘हिट अँड रन’चे प्रकरण रविवारी पहाटे घडले. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बडे नेते राजेश शाह यांच्या मुलाचे नाव समोर आले आहे. राजेश शाह आणि त्याचा चालक याने वरळीत एका दुचाकीला उडवले. त्यात कावेर नखवा (वय ४५) या महिलेचा मृत्यू झाला. आता या प्रकरणातील राजेश शाह यांचा मुलगा मिहिर शाह अडचणीत येत आहे. मिहिर याने शनिवारी रात्री जुहूच्या व्हॉईस ग्लोबल बारमध्ये पार्टी केली. यामुळे मुंबई पोलीस आता बारमध्ये पोहचले आहे.

पोलिसांचे पथक बारमध्ये

वरळी ‘हिट अँड रन’चे प्रकरणात आग्रीपाडा पोलीस आणि जुहू पोलिसांचे पथक जुहू येथील व्हाइस बारमध्ये पोहोचले. या प्रकरणातील आरोपी मिहिर शाह याने काल रात्री ११ वाजता जुहूच्या व्हॉईस ग्लोबल तापस बारमध्ये आपल्या मित्रांसोबत पार्टी केली होती. पार्टीनंतर तो वरळीच्या दिशेने निघाला. त्यानंतरच अपघाताची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्रीपाडा आणि जुहू पोलिसांचे पथक वाइस ग्लोबल बारमध्ये पोहोचले. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

mumbai hit and run

बार मालक काय म्हणाले….

व्हाइस बारचे मालक करण शाह यांनी सांगितले की, मिहिर शाह शनिवारी रात्री 11.08 वाजता चार मित्रांसह मर्सिडीज कारमधून बारमध्ये आले होते. त्यांच्यासोबत कोणतीही मुलगी नव्हती. सर्वांनी एक, एक बिअर घेतली. त्यावेळी चौघेही नॉर्मल होते. बिल भरल्यानंतर 1.26 वाजता निघाले. दरम्यान या ठिकाणी असणारा सीसीटीव्हीचा डीव्हीआर पोलिसांनी जप्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

मुंबई पोलिसांच्या तीन गाड्या याठिकाणी पोहोचल्या आहेत. सुमारे अर्धा तासापेक्षा जास्त वेळ पोलिसांचे पथक घटनास्थळी आहे. पार्टीत किती लोक सहभागी झाले होते आणि त्यांनी मद्यपान केले होते का, याचीही माहिती घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. पोलीस बारमधील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत.

दरम्यान, शिवसेना उबाठा नेते आमदार सचिन अहिर यांनी या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे. हिट आणि रन अपघाताच्या घटना वारंवार होत आहेत. यापूर्वी पुण्यामध्ये अशी घटना घडली होती. या प्रकरणात आपण पोलिसांच्या संपर्कात आहोत, असे आमदार अहिर यांनी म्हटले आहे.

कायद्यासमोर सर्व समान- एकनाथ शिंदे

मुंबईतील ‘हिट अँड रन’ प्रकरणात शिंदे गटातील नेता आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कायद्यासमोर सर्व समान आहे. सरकार देखील सगळ्या घटनांकडे समान दृष्टीने पाहते. त्यामुळे या घटनेला वेगळा न्याय दिला जाणार नाही. जे होईल ते कायदेशीर रित्या होणार आहे. कोणालाही पाठीशी घातली जाणार नाही.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.