CCTV VIDEO | तेजस्विनी बसची ट्रकला धडक, दादरमधील भीषण अपघाताची दृश्यं सीसीटीव्हीत कैद
मुंबईतील दादर परिसरात तेजस्विनी बसचा खूप मोठा अपघात झाला. ही बस मरोळ आगाराची असल्याची माहिती आहे. मरोळ आगाराची बसमार्ग क्रमांक 22 नंबर बसचा आज सकाळी खूप मोठा अपघात झाला. दादर येथे हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार बस वाहक-बस चालक तसेच 7-8 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबई : मुंबईतील दादर (Dadar) परिसरात तेजस्विनी बसचा खूप मोठा अपघात (Tejaswini Bus Accident) झाला. ही बस मरोळ आगाराची असल्याची माहिती आहे. मरोळ आगाराची बसमार्ग क्रमांक 22 नंबर बसचा आज सकाळी खूप मोठा अपघात झाला. दादर येथे हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार बस वाहक-बस चालक तसेच 7-8 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता पुढे आला आहे. या फुटेजमध्ये हे दिसून येते की हा अपघात किती भीषण होता. सीसीटीव्ही फुटेजनुसार ही बसने समोरील कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. ज्यामध्ये बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. यामध्ये बस वाहक-बस चालक तसेच 7-8 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जिवितहानी झालेली नाही.
या जखमींना तात्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सूरु आहेत. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत, नगरसेवक आणि बेस्ट समिति सदस्य अनिल कोकीळ, नगरसेवक प्रभाग समिती अध्यक्ष रामदास कांबळे 4 वाजता सायन हॉस्पिटलमध्ये जखमी प्रवाशांची भेट घेणार आहेत.
पाहा व्हिडीओ –
संबंधित बातम्या :
‘तेजस्विनी बस’ला दादरमध्ये भीषण अपघात, पुढील भागाचा चक्काचूर, चालकासह 7-8 प्रवासी गंभीर