Mumbai Airport वर मोठा अपघात, प्रवाशांनी भरलेल्या विमानाला पुशबॅक देणाऱ्या वाहनाला आग

Mumbai International Airport : मुंबई विमानतळावर एक मोठा अपघात होता होता टळला. एअर इंडियाच्या विमानाला पुशबॅक देणार्‍या वाहनाला विमानाजवळ आग लागली. हे विमान प्रवाशांनी खचाखच भरले होते.

Mumbai Airport वर मोठा अपघात, प्रवाशांनी भरलेल्या विमानाला पुशबॅक देणाऱ्या वाहनाला आग
Fire at Mumbai International Airport
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 3:47 PM

Mumbai International Airport : मुंबई विमानतळावर एक मोठा अपघात होता होता टळला. एअर इंडियाच्या विमानाला पुशबॅक देणार्‍या वाहनाला विमानाजवळ आग लागली. हे विमान प्रवाशांनी खचाखच भरले होते. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या आगीमुळे विमानतळ अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही, ही दिलासादायक बाब आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. एअर इंडियाचे हे विमान मुंबईहून जामनगरला जात होते. (Mumbai International Airport Fire : pushback tug caught fire at Mumbai airport earlier today)

समोर आलेल्या माहितीनुसार, विमान प्रवाशांनी भरलं होतं. एअर इंडियाच्या AIC-647 विमानाजवळ हा अपघात झाला. विमान मुंबईहून जामनगरला जाणार होते. एअर इंडियाच्या या विमानात 85 प्रवासी बसले होते. पुशबॅक ट्रॅक्टरला आग लागल्याची माहिती मिळताच विमानतळावर उपस्थित असलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली.

एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ट्रॉली ओढणाऱ्या ट्रॅक्टरला आग कशी लागली, याचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

आग लागली तेव्हा ही ट्रॉली विमानाच्या अगदी जवळ होती. सुदैवाने आग विमानापर्यंत पोहोचली नाही. आग विमानापर्यंत पोहोचली असती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. ट्रॅक्टरला ही आग कशी लागली याचा तपास सध्या सुरू आहे. अपघातात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या

Honda ची मोठी स्पेस असलेली कार, गाडीतली सीट घरातल्या बेडसारखी सरळ करता येणार

Tanaji Sawant Letter : एसटी विलीनीकरणाबाबत योग्य निर्णय घ्या, शिवसेनेच्या आणखी एका आमदाराचे उद्धव ठाकरेंना पत्र

ED कार्यालयाचा नवीन पत्ता, जिथे ड्रग्ज तस्कर मिरचीने पब थाटला, तिथेच ईडीचे नवे ऑफिस

(Mumbai International Airport Fire : pushback tug caught fire at Mumbai airport earlier today)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.