VIDEO | मुंबईत साचलेल्या पाण्यातून चालताना बापलेक अडखळून पडले, पोलिसाची मदत

कांदिवली वाहतूक चौकीसमोर एक व्यक्ती साचलेल्या पाण्यातून आपल्या लहान मुलीला सुरक्षित ठिकाणी घेऊन जात होता. मात्र पाण्याच्या प्रवाहातून चालताना फुटपाथला अडखळून तो पडला.

VIDEO | मुंबईत साचलेल्या पाण्यातून चालताना बापलेक अडखळून पडले, पोलिसाची मदत
बापलेकीला पोलिसाची मदत
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 8:13 AM

मुंबई : मुंबईत शनिवार-रविवार पडलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश भाग जलमय झाले. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना अनेक जणांची तारांबळ उडाली. कांदिवली भागात मुलीला कडेवर घेऊन जाणारा एक बाप पाण्यातून चालताना अडखळून पडला. मात्र ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसाने त्याला सुरक्षित स्थळी जाण्यास मदत केली.

नेमकं काय घडलं?

जोरदार पावसामुळे मुंबईतील कांदिवली भागातही पोटरीभर पाणी साचलं होतं. कांदिवली वाहतूक चौकीसमोर एक व्यक्ती साचलेल्या पाण्यातून आपल्या लहान मुलीला सुरक्षित ठिकाणी घेऊन जात होता. मात्र पाण्याच्या प्रवाहातून चालताना फुटपाथला अडखळून तो पडला.

यावेळी रात्रपाळी कर्तव्यावर असलेले पोलीस राजेंद्र शेगर यांनी तत्परता दाखवली आणि ते त्याच्या मदतीला धावून गेले. हा पिता आपल्या मुलीला सुखरुप प्रवाहातून बाहेर काढून जाईपर्यंत त्यांनी सोबत केली आणि बापलेकीला सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.

पाहा व्हिडीओ :

अंधेरीतही गेल्या आठवड्यात महिला पडता-पडता बचावली

जलमय भागातून चालताना रस्त्याचा चढउतार, खड्डे किंवा मॅन होल यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात घडल्याचे प्रकार अनेक वेळा ऐकायला मिळतात. साचलेल्या पाण्यातून चालताना अंदाज न आल्यामुळे अंधेरीतील डीएन नगर परिसरात एक पादचारी महिला पाय अडकून पडली होती. सुदैवाने एका महिलेने वेळीच सावरल्याने ती मॅन होलमध्ये पडता-पडता बचावली. 16 जुलै रोजी या घटनेचा व्हिडीओ समोर आला होता.

डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू

दरम्यान, 2017 मध्ये प्रसिद्ध डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. साचलेल्या पाण्यातून गाडी नेणे शक्य नसल्याने डॉक्टर उतरुन चालू लागले होते. मात्र संध्याकलाच्या वेळी मॅनहोलचा अंदाज न आल्याने ते पडून वाहून गेले. त्यांचा मृतदेह वरळी समुद्र किनारी सापडला होता.

संबंधित बातम्या :

मुसळधार पावसाने ठाण्यात इमारतीची भिंत कोसळली, पाच गाड्यांसह दुचाकींचेही नुकसान

VIDEO | साचलेल्या पाण्यातून चालताना पाय अडकला, मुंबईत महिला मॅन होलमध्ये पडता-पडता बचावली

(Mumbai Kandivali Father Daughter falls in flooded water Police rescues duo)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.