परमबीर सिंग बेपत्ता, ठाणे कोर्टापाठोपाठ किल्ला कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी
ठाणे कोर्टापाठोपाठ मुंबईच्या किल्ला कोर्टानेही मुंबईची माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. ( Mumbai killa court issues non bailable warrant against former mumbai police commissioner parambir singh)

मुंबई: ठाणे कोर्टापाठोपाठ मुंबईच्या किल्ला कोर्टानेही मुंबईची माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या याचिकेवर सुनावणी करताना अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. परमबीर सिंग यांच्यासह विनय सिंग आणि रियाज भाटींविरोधातही अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
परमबीर सिंग यांच्या विरोधात मुंबईसह ठाण्यात वसुलीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आलेली आहे. मात्र, अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे ठाणे कोर्टानंतर आता मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे.
संरक्षण नाहीच
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यांच्यावर अॅट्ऱॉसिटी आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात तपासादरम्यान त्यांना वारंवार समन्स बजावूनही ते कुठे आहेत? याचा पत्ता राज्य सरकारला लागू शकलेला नाही. त्यामुळे आता परमबीर सिंह यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार नाही असा शब्द आम्ही देणार नाही, असं राज्य सरकारनं 20 ऑक्टोबर रोजी हायकोर्टात म्हटलं होतं. अॅट्रॉसिटी प्रकरणात दोन वेळा समन्स बजावण्यात आलं होतं त्याला सिंह यांनी उत्तर दिलं होतं, अशी माहिती सिंह यांचे वकील महेश जेठमलानी यांनी कोर्टात दिली आहे. मात्र, यापूर्वी परमवीर सिंह यांच्यावर कठोर कारवाई किंवा त्यांना अटक करणार नाही असं राज्य सराकरनं कोर्टात म्हटलं होतं. पण आजच्या सुनावणीवेळी हा शब्द आम्ही पुढे नेऊ शकणार नाही, कारण ते कुठे आहेत याचा पत्ता आम्हाला लागलेला नाही. ते कुठल्याही समन्सला उत्तर देत नाहीत, असं राज्य सरकारनं म्हटलं आहे.
परमबीर सिंगांवर आरोप काय?
सिंग यांच्याविरोधात एका अधिकाऱ्याने तक्रार केली होती. खोट्या एफआयआरच्या माध्यमातून माझी प्रचंड छळवणूक केली असा आरोप करत पोलिस अधिकाऱ्यानेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. या प्रकरणात सिंह यांना अटकेसारख्या कठोर कारवाईपासून असलेला दिलासा 21 ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवण्यात आला होता.
‘परमबीर सिंह हे ठाण्याते पोलिस आयुक्त असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बिल्डरांच्या एका भ्रष्टाचार प्रकरणातील अनेक आरोपींची नावे वगळण्याच्या त्यांच्या दबावाला मी बळी पडलो नाही. म्हणून माझ्याच विरोधात अनेक खोटे एफआयआर दाखल करायला लावून त्यांनी माझी प्रचंड छळवणूक केली. शिवाय अंतिमत: न्यायालयाच्या निकालाने माझी निर्दोष मुक्तता झालेल्या एका प्रकरणात मला नाहक 14 महिने तुरुंगवास भोगावा लागला’ असा आरोप करत पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी सिंह यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.
Mumbai Court issues non-bailable warrant against former Mumbai Police Commissioner #ParamBirSingh and two other in an extortion case in Goregaon.
This is the second NBW issued against him so far. pic.twitter.com/1wAoRceQND
— Live Law (@LiveLawIndia) October 30, 2021
संबंधित बातम्या:
समीर वानखेडेंनी धर्मांतर केल्याचं दिसत नाही, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांचं मोठं विधान
चोरी करायला दुकानात शिरला, दुकान जाळून खाक केलं, पोलिसांनी पकडलं तेव्हा तर….
(