मुंबईवर पाणीबाणीचं संकट, तलावात केवळ 44 टक्केच जलसाठा
मुंबई : मुंबईकरांना येत्या काळात पाणीकपातीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कारण सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 44 टक्केच जलसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा जलसाठा तब्बल दोन लाख दशलक्ष लीटरने कमी आहे. तलावातील राखीव जलसाठ्यावरच आता महापालिका अवलंबून आहे. त्यामुळे उन्हाळ्यात मुंबईत पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हं आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात यंदा परतीचा पाऊस चांगाल झाला नाही. […]
मुंबई : मुंबईकरांना येत्या काळात पाणीकपातीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कारण सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 44 टक्केच जलसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा जलसाठा तब्बल दोन लाख दशलक्ष लीटरने कमी आहे. तलावातील राखीव जलसाठ्यावरच आता महापालिका अवलंबून आहे. त्यामुळे उन्हाळ्यात मुंबईत पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हं आहेत.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात यंदा परतीचा पाऊस चांगाल झाला नाही. त्यामुळे तलावांमध्ये 93 टक्केच जलसाठा जमा झाला. ही तफावत वाढून 15 टक्के जलासाठा कमी झाल्यामुळे 15 नोव्हेंबर 2018 पासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली. मात्र, गेल्या तीन महिन्यांत तलावांची पातळी आणखी खालावली आहे. सध्या केवळ 44.68 टक्के जलसाठा शिल्लक आहे. पाणीपुरवठ्यासाठी कोणतेही पर्यायी स्रोत नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिकेची मदार आता राखीव जलसाठ्यांवर आहे.
कुठल्या तलावातून किती जलसाठा शिल्लक?
- मध्य वैतरणा – 79719 दशलक्ष लीटर (41 टक्के)
- भातसा – 325993 दशलक्ष लीटर (45 टक्के)
- विहार – 10733 दशलक्ष लीटर (38.75 टक्के)
- तुळशी – 4391 दशलक्ष लीटर (54 टक्के)
- अप्पर वैतरणा – 126029 (55 टक्के) मोडक सागर – 324030 दशलक्ष लीटर (25 टक्के)